धुळे- शिरपूर तालुक्यातील बोराडी गावात 'गाव करील, ते राव काय करील' या वाक्याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशासह राज्यात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सरू करण्यात आला आहे. या वेळी प्रशासनाकडून नागरिकांना कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही नागरिक कायद्याचे उल्लंघन करताना दिसून आले आहे. मात्र, बोराडी गावातील ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव बंद ठेवून शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
गावातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच गावात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच टवाळखोर मुलांवर गावकऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. यामुळे संपूर्ण गाव पूर्णपणे बंद असून गावाने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्यांच्या या कृत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा- कोरोनाच्या भीतीने परराज्यातील नागरिकांचा जीवघेणा प्रवास