धुळे - शहरातील ईदगाह मैदानावर बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
मुस्लीम धर्मात बकरी ईदला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी मुस्लीम बांधव बकरीची कुर्बानी देऊन हा सण साजरा करीत असतात. त्यासाठी धुळ्यातील बाजारपेठ सजलेली पाहायला मिळाली. अनेक मुस्लीम बांधवानी बाजारामध्ये गर्दी केली होती. यावेळी बकरी ईदनिमित्त धुळे शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.