ETV Bharat / state

चंद्रपूर : शेतातील विद्यूत तारांच्या स्पर्शाने तरुणाचा मृत्यू - गोंडपिपरी ताज्या बातम्या

मित्रांसोबत शेतातून घराकडे येत असलेल्या एका तरुणाचा दुसऱ्या एका शेतातील विद्यूत प्रवाह सुरू असलेल्या उघड्या विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Jun 28, 2020, 9:32 AM IST

गोंडपिपरी (चंद्रपूर) - शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे शनिवारी (दि. 27 जून) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश संतोष मडावी (रा. विठ्ठलवाडा) असे मृतकाचे नाव आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील अविनाश मडावी हा आपल्या मित्रासह येनबोथला येथे शेतात गेला होता. शेतातून परत येताना येनबोथला येथील शेतकरी मैदनवार यांनी शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी पसरविलेल्या विजेचा प्रवाह असलेल्या विद्युत तारांना अविनाशचा स्पर्श झाला. यात अविनाशचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहीती गोंडपिपरी पोलीसांना देण्यात आली.

मैदनवार याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. अविनाश हा त्यांचा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूने मडावी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अविनाशच्या अवेळी जाण्याने विठ्ठलवाडा गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा - बल्लारपूर मार्गावर दुचाकीचा अपघात.. एकाचा मृत्यू, एक गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.