चंद्रपूर- अरुण जेटली जो निर्णय घ्यायचे त्या निर्णयावर ठाम राहायचे. निर्णय तडीस नेण्यासाठी ते ओळखले जायचे, असा कणखर नेता आज या देशाने हरपला याचे दुःख मला आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील 'एम्स' रुग्णालयात दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यावर वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. जेटली हे व्यवसायाने वकील होते. देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी जनतेला जे अपेक्षित होते ते निर्णय घेतले, अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपला प्रभाव कधीही कमी पडू दिला नाही. एवढेच नव्हे तर विरोधी पक्षात असूनही त्यांनी आपली वेगळी छाप सोडली, असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.