ETV Bharat / state

चंद्रपूर जिल्ह्यात 25 कामगार कोरोनाबाधित; दोन राईस मिल मालकांवर गुन्हा दाखल - chandrapur corona updates

मूल येथील साईकृपा राईस मिल व ओमसाईराम राईस मिलच्या संचालकांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मात्र, त्यांनी मजूर आणताना विलगीकरण तथा गृह अलगीकरण आदेशाचे उल्लंघन केले. परिणामी या दोन्ही मिलमध्ये 25 पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले. याप्रकरणी मूलचे तहसीलदार डीजी जाधव यांच्या तक्रारीवरून दोन्ही मिलच्या मालकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 कामगार कोरोनाबधित
25 कामगार कोरोनाबधित
author img

By

Published : Jul 27, 2020, 7:52 PM IST

चंद्रपूर : टाळेबंदीत बिहार राज्यातून मजूर आणल्यानंतर 14 दिवसांच्या गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणाऱ्या मूल येथील साईकृपा राईस मिल व ओमसाईराम राईस मिलच्या संचालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राईस मिलमध्ये 25 पेक्षा अधिक मजुरांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या संदर्भात कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच, दोन राईस मिल मालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने 25 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. मूल येथील साईकृपा राईस मिल व ओमसाईराम राईस मिलच्या संचालकांनी बिहार राज्यातून कामासाठी मजूर आणले. मजूर आणताना विलगीकरण तथा गृह अलगीकरण आदेशाचे सक्त पालन करावे, असे या दोन्ही राईसमिल मालकांना सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी या आदेशाचे पालन केले नाही. त्याचा परिणाम या दोन्ही राईस मिलमध्ये 25 पेक्षा अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याप्रकरणी मूलचे तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या तक्रारीवरून साईकृपा व ओमसाईराम राईस मिलच्या मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी जानाळा येथे 50 लोकांची परवानगी असताना 130 पेक्षा अधिक लोकांना निमंत्रित करून विवाह समारंभ साजरा करणाऱ्या आयोजकांविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रतिबंधीत क्षेत्राचे नियम न पाळणे, होम क्वारंटाईन असताना बाहेर पडणे, मॉस्क न वापरणे, समाजाला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने वर्तणूक करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.