ETV Bharat / state

दिलादायक! चंद्रपुरात 24 तासात 1160 जणांनी केली कोरोनावर मात - चंद्रपूर कोरोना

सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 57 हजार 584 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

चंद्रपूर कोरोना अहवाल
चंद्रपूर कोरोना अहवाल
author img

By

Published : May 19, 2021, 1:48 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात 24 तासात 1160 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 370 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 26 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 78 हजार 509 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 68 हजार 835 झाली आहे. सध्या 8 हजार 373 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 39 हजार 35 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 57 हजार 584 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर वार्ड येथील 70 वर्षीय पुरुष, नेहरू नगर येथील 62 वर्षीय पुरुष, सिव्हिल लाईन परिसरातील 65 वर्षीय पुरुष, पडोली येथील 45 वर्षीय पुरुष, तुकूम परिसरातील 56 वर्षीय महिला, नगीनाबाग येथील 69 वर्षीय महिला, 49 वर्षीय महिला, देवाडा येथील 70 वर्षीय पुरुष, कोकेवाडा येथील 43 वर्षीय पुरुष. किटाळी-शिदूर येथील 61 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 42 वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील 82 वर्षीय महिला, विसापूर येथील 52 वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील 55 व 65 वर्षीय महिला, मूल तालुक्यातील 68 व 76 वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील 68 व 75 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील 23 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, अडेगाव येथील 60 वर्षीय महिला, नागभीड तालुक्यातील 60 वर्षीय महिला तर वणी येथील 61 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1301 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1204 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 44, भंडारा 11, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. बाधीत आलेल्या 370 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 127, चंद्रपूर तालुका 33, बल्लारपूर 27, भद्रावती 06, ब्रम्हपुरी 16, नागभिड 19, सिंदेवाही 12, मूल 25, सावली 16, पोंभूर्णा 07, गोंडपिपरी 19, राजूरा 16, चिमूर 03, वरोरा 21, कोरपना 15, जिवती 03 व इतर ठिकाणच्या 05 रुग्णांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.