चंद्रपूर (चिमूर) - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरजवंताचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत, म्हणून एपीएल शिधा पत्रीकाधारकांनाही धान्य मिळणार आहे. ज्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत धान्य मिळत नव्हते, अशा दारीद्रय रेषेवरील (केशरी कार्ड) धारक तथा शेतकरी योजनेत समाविष्ठ न झालेल्या (केशरी) शिधा पत्रीका धारकांनाही धान्य मिळावे, अशी मागणी मोठया प्रमाणात होत होती. या मागणीचा विचार करून, अशा शिधा पत्रीका धारकांना मे व जुन महिन्या करीता प्रति सदस्य ५ किलो प्रमाणे धान्य वितरण करण्याचे ठरवुन तसे आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाद्वारे काढण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमूळे गरीब, मजुर, बेघर तसेच असंघटीत कामगारावर पडणाऱ्या सर्वाधिक प्रतिकुल परिणामाचा विचार करून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेची प्रधानमंत्र्यानी घोषणा केली. या योजनेत दारीद्रय रेषेखालील कुंटूब तसेच प्राधान्यक्रम कुंटुंब शिधा पत्रीकाधारकांना एप्रिल ते जुन या 3 महिन्या करीता प्रति कुंटूब सदस्य ५ कीलो तांदुळ मोफत वितरण सुरू करण्यात आले आहे. मात्र, नोव्हल कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने निर्माण झालेल्या परीस्थीतीमध्ये ए पी एल (केसरी) कार्ड धारकांनाही धान्य मिळावे, अशी मागणी नागरीक करीत होते. या मागणीचा विचार करून महाराष्ट्र राज्य शासणाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत मे व जुन महिन्या करीता सवलतीच्या दरात धान्य वितरीत करण्याचे ठरविण्यात आले.
अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागा मार्फत काढलेल्या आदेशा प्रमाणे प्रति कुटूंब सदस्य 5 कीलो धान्य वितरीत केले जाणार आहे. यामध्ये 3 किलो गहु ८ रुपये तथा 2 किलो तांदुळ 12 रूपये सवलतीच्या दराने मिळणार आहे.
ज्या केसरी शिधा पत्रीकेची संगणकामध्ये नोंदणी झाली नसेल तसेच ज्यांनी शिधा पत्रीकेला आधार लिंक केला नसेल अथवा काही कारणाने झाले नसेल तरी अशानांही धान्यांचे वितरण होणार असल्याची माहीती तालुका निरीक्षण अधिकारी आशीष फुलके यांनी दिली.
सरकारच्या या निर्णयाने लॉकडाऊनमूळे मेटाकुटीस आलेल्या सामान्य ए पी एल ( केशरी ) कार्ड धारकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे .
नोव्हेल कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ए पि एल (केशरी) कार्ड धारकांना मे व जुन महिन्या मध्ये प्रति कुंटूब सदस्य ५ किलो प्रमाणे धान्य मिळणार आहे. त्यात ३ किलो गहु ८ रुपये प्रति किलो व २ किलो तांदुळ १२ रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने मिळेणार आहे.