नंदुरबार- विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेला मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी पोलिसांनी सीआयएसएफच्या जवानांसह विसरवाडी व खांडबारा गावात पथसंचलन केले.
हेही वाचा- कर्जत विधानसभा मतदारसंघ : महायुती विरुद्ध आघाडी अशी सरळ लढत
या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, सीआयएसएफचे उपनिरीक्षक लोकेंद्रसिंग, भरत प्रसाद, हे.कॉ.राजेश येलवे, सुरेश चौरे, विजय वळवी, महादेव गुटे, सिताराम पावरा, रविंद्र अहिरे, भगवान गुटे, नितीन सोनवणे, विजय पाडवी, अनिल राठोड, आकाश वळवी, योगेश्वर मराठे, प्रदिप वाघ, अरुण कोकणी, अधिकार साबळे, तुषार पाडवी, मुकेश साळवे, अतुल पानपाटील यांच्यासह सीआयएसएफचे 46 जवानांनी पथसंचलन केले.