ETV Bharat / state

पालकांनी फी वाढीच्या तक्रारी केल्या; शाळेने पोस्टाने पाठवल्या विद्यार्थ्यांच्या टीसी - नारायणा स्कुल पोस्टाने टीसी पाठवल्या

कोरोनाच्या काळात आर्थिक संकट मोठे होते. याचा फटका अनेक पालकांच्या उत्पन्नावर झाला. मात्र यावेळी देखील फी वाढीत सूट देण्यात आली नाही. याविरोधात अनेक पालकांनी आक्षेप घेतला. तसेच याविरोधात शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या तक्रारींमुळे शाळेने तक्रार करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांची टीसी थेट पोस्टाने घरी पाठविण्यात आली आहे.

school give TC to students because parents complain in chandrapur
पालकांनी फीवाढीच्या तक्रारी केल्या; शाळेने पोस्टाने पाठवल्या विद्यार्थ्यांच्या टीसी
author img

By

Published : Aug 30, 2021, 8:38 PM IST

चंद्रपूर - शाळेने वाढविलेल्या भरमसाठ फीच्या दरवाढीविरोधात पालकांनी आवाज उठविला त्यामुळे त्यांच्या पाल्य विद्यार्थ्यांना शाळेने चक्क पोस्टाने टीसी पाठविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पडोली येथील नारायणा विद्यालय येथील हा प्रकार असून याविरोधात पालकांनी आवाज उठवला आहे. याबाबत पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून विद्यार्थ्यांना पूर्ववत शाळेत घेण्यात यावे तसेच शाळेच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.

पालकांनी फीवाढीच्या तक्रारी केल्या; शाळेने पोस्टाने पाठवल्या विद्यार्थ्यांच्या टीसी

शाळेची तक्रार केली म्हणून पाल्यांचे पाठवले टीसी -

पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळा दरवर्षी 15 टक्के फी वाढ करीत आहे. याबाबत विचारणा केली असता न्यायालयाच्या निर्देशानुसार फी दरवाढीबाबत कुठलेही निकष नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, “महाराष्ट्र खाजगी शिक्षण संस्था अधिनियम 2011" नुसार कुठलीही संस्था ही दर तीन वर्षाला कमाल 15% पर्यंत फी वाढ करू शकते. मात्र ह्या नियमाला तिलांजली देण्यात आली. कोरोनाच्या काळात आर्थिक संकट मोठे होते. याचा फटका अनेक पालकांच्या उत्पन्नावर झाला. मात्र यावेळी देखील फी वाढीत सूट देण्यात आली नाही. याविरोधात अनेक पालकांनी आक्षेप घेतला. तसेच याविरोधात शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शिक्षणमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या तक्रारींमुळे शाळेने तक्रार करणाऱ्या पालकांना त्यांच्या मुलांची टीसी थेट पोस्टाने पाठविण्यात आली. विशेष म्हणजे पालकांनी याबाबत कुठलीही मागणी केली नसताना केवळ सूड उगविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असे पालकांचे म्हणणे आहे.

पालकांनी तणावात काही केले तर जबाबदार कोण?

रजिस्टर पोस्टाद्वारे टीसी पाठविण्यात आल्या आहेत. परस्पर टी.सी पालकांच्या घरी पाठवून देणे ही बाब संविधानातील मूलभूत हक्क भंग करणारी आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक हे दोन्ही अर्धवट शैक्षणिक सत्रामध्ये टी.सी दिल्या मुळे प्रचंड मानसिक दबावात आली आहे. याच तणावात जर कुणी आपल्या जीवाचे कमी-जास्त केले तर याला शाळेची मुख्याध्यापिका श्रबोणी बॅनर्जी व मॅनेजर सुनील राव यांची जबाबदारी असेल. असा इशारा पालकांनी दिला आहे. टी.सी. दिलेल्या पालकांनी शाळेच्या आवारात प्रवेश करू नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अशी सुचना वजा इशारा शाळेने दिला आहे. असे पालकांनी सांगितले आहे. आमच्या मुलांच्या गुणपत्रिका, स्पर्धा परिक्षेचे प्रमाणपत्र तसेच आमच्या मुलांचे पदके व बक्षीसे ही शाळेत आहेत ते मागायला जाणे म्हणजे ही गुन्हा आहे का? असा सवाल यावेळी पालकांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदेत सचिन महाजन, वैशाली टोंगे, विवेक जोगी, पुरुषोत्तम आवळे, श्रद्धा मालुसरे आदी पालकांची उपस्थिति होती.

हेही वाचा - कितीही छळ करा; मी घाबरणारा किंवा झुकणारा नाही, एकनाथ खडसे भाजपवर बरसले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.