ETV Bharat / state

Chandrapur : आधी 'एक घास मदतीचा', आता 'या' उपक्रमातून नम्रता ठेमस्कर करत आहेत रुग्णांची सेवा

प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता दर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देतात. रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना काय असुविधा होतात याची माहिती त्या घेतात. आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे रुग्णांना भक्कम मानसिक आधार तर मिळतच आहे सोबत जिल्हा रुग्णालयातील समस्या सुटण्यास मोठी मदत होत आहे.

author img

By

Published : Jan 8, 2022, 10:05 PM IST

Namrata Themaskar helping patients
नम्रता ठेमस्कर उपक्रम चंद्रपूर

चंद्रपूर - जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजे अव्यवस्थेचे माहेरघर. रुग्णांची हेळसांड तर इथे पाचवीलाच पूजलेली असते. डॉक्टर उपलब्ध नाहीत, औषधे नाहीत, उपचाराच्या सोयीसुविधा नाहीत, ही गोष्ट नित्याचीच असते. अशावेळी हतबल झालेल्या गरीब रुग्णांनी आणि त्याच्या नातेवाईकांनी दाद मागायची तरी कुठे? हा प्रश्नच असतो. कारण ऐकायला आणि जुमानायला कोणी तयार नाही, अशी निष्ठुर आरोग्य व्यवस्था आहे. चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय देखील याला अपवाद नाही. मात्र, ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य - ठेमस्कर यांनी पुढाकार घेतला आहे.

माहिती देताना सामाजिक कार्यकर्त्या नम्रता ठेमस्कर

हेही वाचा - Shivsena Against Illegal Coal Depot : चंद्रपुरातील अवैध कोळसा डेपो बंद करण्याची मागणी.. शिवसेनेचा मोर्चा

नम्रता दर गुरुवारी या रुग्णालयाला भेट देतात. रुग्णांची आस्थेने विचारपूस करून त्यांना काय असुविधा होतात याची माहिती त्या घेतात. आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करतात. यामुळे रुग्णांना भक्कम मानसिक आधार तर मिळतच आहे सोबत जिल्हा रुग्णालयातील समस्या सुटण्यास मोठी मदत होत आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय आता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले आहे. मात्र, इमारतीचे बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कारभार वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे आहे. मात्र, अजूनही येथील आरोग्य यंत्रणा जैसे थेच आहे. डॉक्टर वेळेवर येत नाहीत, योग्यवेळी उपचार मिळत नाही, औषधे - गोळ्या बाहेरून आणाव्या लागतात, रक्त तसेच इतर चाचण्या बाहेर कराव्या लागतात, अशी येथे स्थिती आहे. ज्यांची खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची ऐपत नाही असे गरीब लोक इथे नाईलाजाने येतात. त्यांना अशावेळी नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागतो. येथे अत्यंत दुर्गम ठिकाणाहून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. अगदी तेलंगणा राज्यापासून तर जिवती, कोरपना, चिमूर सारख्या दुर्गम ठिकाणाहून. नम्रता आचार्य - ठेमस्कर अशा रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

ठेमस्कर या प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव आहेत. मात्र, समाजकारणच राजकारणाचा मुख्य पाया आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. याच प्रेरणेने ते कार्य करीत आहेत. आपल्या महिला कार्यकर्त्यांसह त्या दर गुरुवारी अचानक कुठल्याही वॉर्डात जाऊन तेथील रुग्णांशी संवाद साधतात. रुग्णांच्या समस्या डीन, वैद्यकीय अधीक्षक यांच्यापर्यंत पोचवतात. त्यातूनही निराकरण झाले नाही तर, थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यापर्यंत समस्या पोचवतात. त्यामुळे, त्यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात वचक आहे. यापूर्वी येथे सोनोग्राफी करण्याची मशीन धूळ खात होती. गर्भवती महिलांना पैसे मोजून बाहेरून सोनोग्राफी करावी लागायची. ठेमस्कर यांच्या पाठपुराव्याने आता येथील सोनोग्राफी मशीन सुरू झाली आहे.

हाडांशी संबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या मशीनमध्ये देखील बिघाड आला होता. त्यामुळे, गंभीर रुग्णांना थेट नागपूर येथे रेफर केले जात होते. नम्रता ठेमस्कर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर हे मशीन आता दुरुस्त होऊन रुग्णांच्या सेवेत आहे. याचप्रमाणे शौचालयाची स्वच्छता, पिण्यासाठी आरओचे स्वच्छ पाणी अशा अनेक सोयी त्यांच्या प्रयत्नातून झाल्या आहेत. मात्र, औषधसाठा, विविध तपासण्या याची समस्या अद्याप कायम आहे. यासाठी देखील नम्रता ठेमस्कर पाठपुरावा करीत आहेत.

समस्या सुटेपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असा नम्रता यांचा संकल्प आहे. एरव्ही शासकीय रुग्णालयातील रुग्णांकडे कोणीही लक्ष देत नाही. नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फळवाटपाच्या बहाण्याने केवळ फोटोसेशन पर्यंत कळवळा मर्यादित असतो. जनसामान्यांची सेवा करून राजकारण करण्याची संकल्पना देखील हद्दपार होताना दिसत आहे. अशा काळात नम्रता ठेमस्कर यांचा हा उपक्रम राजकारण आणि समाजकारणाला एक वेगळी दिशा देणारा आहे.

असा सुरू झाला उपक्रम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजला होता. कोरोनाच्या रुग्णांना बेड मिळणे देखील अवघड झाले होते. अशावेळी कोरोनाग्रस्तांना बाहेरच थांबावे लागत होते. मिळेल त्या आडोशाचा आधार घेऊन त्यांना दिवस काढावे लागत होते. असे शेकडो नातेवाईक रुग्णालय परिसरात दिसून येत होते. दिवस कसाबसा निघायचा. पण, पोटाच्या आगीचे काय? हा प्रश्नच होता. बाहेर काही खावे तर गाठीशी तेवढे पैसेही नाहीत. अशावेळी नम्रता आचार्य - ठेमस्कर यांच्या पुढाकाराने 'एक घास मदतीचा' असा उपक्रम सुरू करण्यात आला.

महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या घरून या रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरवणे सुरू केले. तसेच, आपल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संपर्क केंद्र सुद्धा स्थापित केले. यामुळे आपल्या नातेवाईकांची तब्येत कशी आहे, याची महिती त्यांना थेट मिळायची. मात्र, हळूहळू लाट ओसरली. कोविड केअर सेंटर बंद झाले. मात्र, यादरम्यान ठेमस्कर यांनी आपला गरजू लोकांशी संपर्क तुटू दिला नाही. मग त्यांनी दर गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांना भेट देण्याचा उपक्रम सुरू केला, जो आजतागायत अविरत सुरू आहे.

हेही वाचा - चंद्रपूर : दारुड्या पतीने पत्नीला डिझेल टाकून जाळले; पत्नीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.