ETV Bharat / state

शेतावर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विहिरीत उडी घेत संपवले जीवन - chandrapur crime news

शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पीडित मुलीने आत्महत्या केली असून आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली.

शेतावर गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; विहिरीत उडी घेत संपवले जीवन

author img

By

Published : Aug 9, 2020, 5:05 PM IST

चंद्रपूर - शेतात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार केला. यामुळे त्या मुलीने विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन अजय नन्नावरे व मंगेश मगरे यांना नागभीड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मृत मुलगी ही नुकतीच दहावीच्या परीक्षेत 61 टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली होती. 7 ऑगस्टला ती पालकांच्या सांगण्यावरून शेतात गेली होती. तिची आई पेरणीचे काम सुरू असल्याने मजुरीला गेली होती. शेताकडे जात असताना अजय व मंगेशने मुलीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर शेतात तिला गाठून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. या घटनेने ती भेदरली होती. त्याचदिवशी संध्याकाळी तिने घरून पेन व कागद आणत घटनाक्रम लिहून विहिरीत उडी घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत मुलगी घरी न आल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध सुरू केला. त्यावेळी शेतात एका ठिकाणी चिठ्ठी सापडली. त्यानंतर मुलीच्या आईने तत्काळ नागभीड पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार केली.

दिलेल्या तक्रारीवरुन ठाणेदार गोतमारे यांनी त्वरित दोघा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध बलात्कार, बाललैंगिक शोषण प्रतिंबधक कायदा (पोक्सो) व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.