ETV Bharat / state

VIDEO : राजुरा, कोरपना तालुक्यांना वादळी पावसाने झोडपले - जोरदार पाऊस चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना तालुक्यातील बऱ्याच भागाला आज चार वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. साधारण अर्धा तास हा पाऊस बरसला, त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते.

Heavy rains with strong winds in Rajura Korpana taluka of Chandrapur
चंद्रपूरातील राजूरा, कोरपना तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
author img

By

Published : May 6, 2020, 5:57 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा, कोरपना तालुक्यातील अनेक भागात आज (बुधवार) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या पावसात अनेक घरांवरील पत्रेही उडून गेले. महत्वाचे म्हणजे वादळी पावसाने अनेक ठिकाणी विद्युत वाहिनी तारांवर झाडाच्या फांद्या कोसळल्याने अनेक ठिकाणचा विद्यूत पुरवठादेखील खंडित झाला होता.

चंद्रपूरातील राजूरा, कोरपना तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

हेही वाचा... आंध्र प्रदेश : गुंटूरमध्ये दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना तालुक्यातील बऱ्याच भागाला आज चार वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. साधारण अर्धा तास हा पाऊस बरसला, त्यामुळे सकल भागात पाणी साचले होते. तसेच अनेक भागात गारपीटदेखील झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.