चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री वादळी पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्याचा अनेक गावांना फटका बसला आहे. वादळामुळे रस्त्यावरील अनेक झाडे कोसळली. घरावरील टिनपत्रे उडाले आहेत. तर विद्युत खांबावर झाड कोसळल्याने काही काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वादळात वेळगाव ते लाठी मार्गावरील अनेक झाडे उन्मळून पडली. परिणामी मार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. तर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतात भाजीपाला होता. या पावसामुळे भाजीपाल्याचेदेखील नुकसान झाले आहे.
गोंडपिपरी तालुक्यात वादळी वार्यासह पावसाची हजेरी - चंद्रपूर अवकाळी पाऊस
गोंडपिंपरी तालुक्यात अचानक आलेल्या वादळी पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.