ETV Bharat / state

चंद्रपूर : तीस जनावरांचा बळी गेल्यानंतरही क्षतीग्रस्त पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच - चंद्रपुरात तीस जनावरांचा मृत्यू

सोमणपल्ली- कोंढाणा या दोन गावांच्या मार्गातून मोठा नाला वाहत असल्याने दहा वर्षांपूर्वी या नाल्यावर पुलाची निर्मीती झाली. मात्र पहिल्याच पावसात पुलाचा बराच भाग वाहून गेल्याने नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत असताना आतापर्यंत ३० जनावरांनाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोंढाणा-सोमनपल्ली पूल तातडीने बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

तीस जनावरे गिळणाऱ्या क्षतीग्रस्त पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच
author img

By

Published : Aug 23, 2019, 8:26 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली-कोंढाणा या गावाला जोडणारा पूल पूरामुळे क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नाल्यातील पुरात आठवडाभरात तीस पाळीव जनावरे वाहून गेली आहेत. मात्र, गावातील शेतकऱ्यांचा नाईलाज असल्याने हा जीवघेणा प्रवास अद्यापही सुरू आहे.

तीस जनावरे गिळणाऱ्या क्षतीग्रस्त पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच

सोमणपल्ली- कोंढाणा या दोन गावांच्या मार्गातून मोठा नाला वाहतो. साधारणतः दहा वर्षांपूर्वी या नाल्यावर पुलाची निर्मिती झाली. मात्र पहिल्याच पावसात पुलाचा बराच भाग वाहून गेला. तेव्हापासून पुलाच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने दिली. मात्र प्रशासनाने बांधकाम केले नाही. परिणामी अवघ्या आठवडाभरात या नाल्याने तीस जनावरे गिळंकृत केली.

सोमनपल्ली येथील शेतकऱ्यांची जमीन कोंढाणा परिसरात आहे. गावातील जनावरांना चराईसाठी नाइलाजाने नाल्यातील पुराच्या पाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागते. यावेळी जनावरे वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. याप्रकाराने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे लोकांना तीच कसरत करावी लागत आहे. गुरेही पूर पार करून पलीकडे जात आहेत. कोंढाणा येथील विद्यार्थ्यांची शाळा बंदच आहे. पूर असल्याने त्यांना शाळेत जाता येत नाही. त्यामुळे कोंढाणा-सोमनपल्ली पूल तातडीने बांधण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Intro:चंद्रपुर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सोमनपल्ली- कोंढाणा या गावाला जोडणारा पूल दहा वर्षांपूर्वी पुराने क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे येथील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. नाल्यातील पुरात आठवडाभरात तीस पाळीव जनावर वाहून गेली आहेत. मात्र, गावातील शेतकऱ्यांचा नाईलाज आहे, त्यामुळे हा जीवघेणा प्रवास अद्यापही सुरू आहे.

सोमणपल्ली- कोंढाणा या दोन गावांचा मार्गातून माेठा नाला वाहतो. साधारणतः: दहा वर्षापूर्वी या नाल्यावर पुलाची निमीर्ती झाली .मात्र पहील्याच पावसात पुलाचा बराच भाग वाहून गेला. तेव्हापासून पुलाच्या बांधकामासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदन दिली. मात्र प्रशासनाने बांधकाम केले नाही. परिणामी अवघ्या आठवडाभरात या नाल्याने तीस जनावर गिळंकृत केली. सोमनपल्ली येथील शेतकऱ्यांची कोंढाणा परिसरात आहे. गावातील जनावरांना चराईसाठी नाइलाजाने नाल्यातील पूर पार करावा लागतोय. नाल्यातील पूर पार करतं असताना जनावरे वाहून जात आहेत. याप्रकाराने बळीराजाचे माेठे आर्थिक नुकसान होत आहे. गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा नाला दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे लोकांना तीच कसरत करावी लागत आहे. गुरेही पूर पार करून पलीकडे जात आहेत. कोंढाणा येथील विद्याथ्र्यांची शाळा बुडत आहे. पूर असल्याने ते शाळेत जाऊ शकत नाही. त्यामुळे कोंढाणा-सोमनपल्ली पूल तातडीने बांधण्याची मागणी पुढे येत आहे.

बाईट : परशुराम कुबडे,
उपसरपंच, सोमनपल्ली
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.