ETV Bharat / state

आम्हाला झोडपून काढण्यासोबत सर्वांना विषाचा प्याला द्या; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर आंदोलनकर्त्या कोरोना योद्ध्यांचा तीव्र निषेध - चंद्रपूर आंदोलन बातमी

चंद्रपूर जिल्ह्यातील काही कोरोना योद्ध्यांना मागील सात महिन्यांचे वेतन आम्हाला मिळाले नाही. यामुळे मागील दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन करत आहेत.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Apr 7, 2021, 4:41 PM IST

Updated : Apr 7, 2021, 5:26 PM IST

चंद्रपूर - ज्यावेळी कोरोनाने हाहाकार माजवला होता तेव्हा काम करायला कोणी पुढे धजावत नव्हते. त्यावेळी आम्ही जिवाची पर्वा न करता कोरोना योद्ध्दा म्हणून काम केले. संपूर्ण संचारबंदी असताना वाहने मिळत नव्हती, अनेक किलोमीटर पायदळी चालत आम्ही हे काम करत होतो. पण, मागील सात महिन्यांचे वेतन आम्हाला मिळाले नाही. म्हणून आम्ही आपल्या मुलाबाळांना घेऊन आंदोलनाला बसलो. दोन महिने लोटले तरी वेतन मिळाले नाही. त्यावर पालकमंत्री वडेट्टीवार हे आम्हाला झोडपून काढण्याची भाषा करतात. आम्हाला झोडपून काढावे आणि सर्व 500 सफाई कामगारांना विषाचा प्यालाही त्यांनी द्यावा. या भाषेत या महिला सफाई कामगारांनी वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलक

कोरोनाच्या काळात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कोविड योद्ध्यांचे सात महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यासाठी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात मागील दोन महिन्यांपासून 500 महिला सफाई कामगार हे आंदोलनाला बसले आहे. आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील दोन महिन्यांपासून या सर्व महिला कामगार डेरा आंदोलन करतआहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे. मात्र, जोवर थकीत वेतन मिळत नाही तोवर कामबंद आंदोलन सुरूच राहणार, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

वडेट्टीवारांनी कोरोना योद्ध्यांची माफी मागावी - आंदोलनकर्ते

याबाबत जनविकास सेनेने आंदोलनाच्या ठिकाणी पत्रकार परिषदे घेऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. पगारासाठी दोन महिन्यांपासून या कोविड योद्ध्यांना रस्त्यावर झोपावे लागत आहे. त्यांना पगार द्यायचा नाही, त्यांचे सांत्वन करायचे नाही आणि झोडपून काढण्याची भाषा करायची हेच महाविकास आघाडीचे धोरण आहे काय याचे उत्तर मंत्री वडेट्टीवार यांनी द्यावे आणि जाहीर माफी मागावी, अशी मागणी पप्पू देशमुख यांनी केली आहे.

डेरा आंदोलन चुकीचे असेल तर सांगावे

कामगारांना पगार मिळाला नाही हे खोटे आहे का, सात महिन्याचा थकीत पगार मागणे चुकीचे आहे का, उच्च न्यायालयाने कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन देण्याचे आदेश दिले, उच्च न्यायालयाचा आदेश चुकीचा आहे का, कामगार विभागाने मेडिकल कॉलेजमधील सदोष कंत्राटदारांवर फौजदारी खटले दाखल केले, हे चुकीचे आहे काय, राज्य मानवाधिकार आयोगाने या आंदोलनाची दखल घेतली हे चुकीचे आहे का, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यावर खटला चालविण्याची परवानगी कामगार विभागाने मागितली हे चुकीचे आहे का, सरकार नियमानुसार किमान वेतन मागणे चुकीचे आहे का, याचे उत्तर पालकमंत्री वडेट्टीवार यांनी द्यावे, असे आवाहन जनविकास सेनेने जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

हेही वाचा - चंद्रपूरकरांनो हे घ्या फुकटचे प्रदूषण; जिल्हा प्रशासनाने बंद करण्याचे आदेश देऊनही 23 कोळसा डेपो सुरूच

Last Updated : Apr 7, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.