ETV Bharat / state

चंद्रपुरात शेअर मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याची आत्महत्या

चंद्रपुरात शेअर मार्केटिंग कंपनीत काम करणार्‍या दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

suicide
शेअर मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याची आत्महत्या
author img

By

Published : May 28, 2020, 9:35 AM IST

चंद्रपूर - शेअर मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या दाम्पत्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उजेडास आली. हे दाम्पत्य घुग्घुस येथील म्हातारदेवी मार्गावरील साहनी कॉम्प्लेक्स येथे भाड्याच्या घरात राहत होते. देबाशीष रॉय आणि शेषी टोपे असे या दाम्पत्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीही लिहिली. यात 'आम्ही चुका केल्या. त्यातून आम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आमच्या मदतीला कोणीही आले नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतोय' असे नमूद केले आहे.

हे दाम्पत्य बियोंड पॉवर निर्मल बैंग नावाच्या शेयर मार्केटिंग कंपनीत काम करीत होते. त्यांचे कार्यालय राजीवरतन चौक येथील असलम काम्प्लेक्स मध्ये होते. आज दुपारी दीड वाजता घरमालक प्रवीण कोंकटी यांनी देबाशीष रॉय यांच्या मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते उत्तर देत नाही म्हणून त्यांच्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला. मात्र त्यांनी ही उत्तर न दिल्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष जावून दार वाजवून आवाज दिला. मात्र, दार आतून बंद होते व कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी घुग्घुस पोलीस स्टेशनला सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दरवाजा तोडला असता, सीलिंग पंख्याला लटकलेले मृतदेह निदर्शनास आले. त्यांच्या शेजारी लिखीत स्वरुपात माफीनामा मिळाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेड़कर हे घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहे. या घटनेबाबत उलटसुलट चर्चा परिसरात सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.