चंद्रपूर - गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयातील नेत्र विभाग नेहमीच अनेक कारणांमुळे वादग्रस्त ठरत असतो. अशातच शुक्रवारी दुपारच्या सुमारास नेत्र तपासणीसाठी आलेल्या वृद्ध महिलेला बाहेर हाकलून लावल्याने डाॅक्टर विरुद्ध रुग्ण असा खडाजंगी सामना रंगला होता. या प्रकाराने शेकडो रुग्ण संतापले. त्यामुळे सदर प्रकरण आपल्याला भारी पडणार या भीतीने महिला डॉक्टर ढसाढसा रडल्या.
डोळे तपासणीसाठी आज अनेक महिला रूग्णालयात दाखल झाल्या होत्या. महिला डॉक्टर हे तपासणीचे काम करत होत्या. तपासणी सुरू असताना एका रुग्ण महिलेला काही अक्षरांची ओळख सांगता आली नाही. या मुद्द्यावरुन महिला रूग्णाने असभ्य बोलल्याचा ठपका ठेवत डॉक्टरने या रूग्णाला हात धरून बाहेर काढले. या घटनेमुळे रुग्णालयाबाहेरील लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.
हेही वाचा - महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री
रूग्ण कल्याण समितीचे सदस्य साईनाथ मास्टे यांनी महिला डॉक्टरला समजवण्याचा प्रयत्न केला. मास्टेच्या भाष्यावर आक्षेप घेत डॉक्टर रडायला लागल्या. सोबतच त्या महिला रूग्णाच्या अंगावर धावूनही गेल्या. अखेर या प्रकरणाची माहिती मास्टे यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण शांत झाले.
हेही वाचा - 'पंतप्रधानांनी उच्चशिक्षित व्यक्तीकडून संविधान समजून घ्यावं'