ETV Bharat / state

होय! 'त्या' वाघाला वाचवता आले असते; वन्यजीवप्रेमींची चौकशीची मागणी

संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा वन्यजीवप्रेमींकडून देण्यात आला आहे. वन्यजीवप्रेमींच्या या भूमिकेमुळे वनविभागाच्या एकूण बचावकार्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाघाला पकडण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने पिंजरा सोडण्यात आला.
author img

By

Published : Nov 11, 2019, 8:25 PM IST

चंद्रपूर - अंधाराचे कारण सांगत बचावकार्य थांबवणाऱ्या वनविभागाला वाघाला वाचवण्यात अपयश आले आहे. योग्य नियोजन तसेच सकारात्मक प्रयत्न केले असते; तर वाघाला वाचवण्यात यश आले असते, असा दावा काही वन्यजीवप्रेमींकडून करण्यात येत आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचा इशारा वन्यजीवप्रेमींकडून देण्यात आला आहे. वन्यजीवप्रेमींच्या या भूमिकेमुळे वनविभागाच्या एकूण बचावकार्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वन्यजीवप्रेमींच्या या भूमिकेमुळे वनविभागाच्या एकूण बचावकार्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

6 नोव्हेंबरला भद्रावती तालुक्यातील चारगाव खाणीजवळ सकाळच्या सुमारास एक वाघ नदी काठावरील दोन दगडांमध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर या सर्वप्रथम त्या ठिकाणी दाखल झाल्या.

वाघ अडकलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचणे कठीण होते. यासाठी वेकोली प्रशासनाने मदत करून सर्व साधने उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी तात्पुरता रस्ता तयार करण्यात आला. बचावकार्य संपुष्टात येच असतानाच या चमूने फटाके फोडले. यामुळे वाघ घाबरून पाण्यात गेला. यानंतर वाघाला पकडण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने पिंजरा सोडण्यात आला. मात्र चवताळलेल्या वाघाने यावर हल्ला चढवला. याच दरम्यान पिंजऱ्याचा लोखंडी दरवाजा वाघाला लागल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. शेवटी अंधार पडल्याने हे ऑपरेशन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. या मृत्यूने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे.

वनविभागाचे ढिसाळ नियोजन व हलगर्जीपणा यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. योग्य प्रयत्न केले असते; तर वाघाला वाचवण्यात यश आले असते, असा दावा काही वन्यजीवप्रेमींनी केला आहे. तसेच त्यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची सविस्तर माहिती मागवण्यात आली असून, यासाठी त्यांनी मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांना निवेदन दिले आहे. तसेच माहिती न मिळाल्यास या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी ते न्यायालयात जाणार असल्याचा दावा वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

आरोप व घटनाक्रम

- माहिती मिळाल्यानंतरही कार्यातील जबाबदारी असलेले अधिकारी उशिरा पोहोचले
- एकूण परिस्थिती व त्यावर उपाय करण्यास उशीर
- वाघ फटीत अडकला नसून, मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने तो दोन खडकांच्या मध्ये आला होता. यावेळी वाघाच्या बाजूला फटाके फोडण्यात आल्याने तो घाबरून पाण्यात गेला.
- वाघाचे मागचे दोन्ही पाय काम करत नसल्याची बाब रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कोणाच्याही लक्षात आली नाही.
- याचवेळी थेट पिंजरा सोडण्यात आल्याने त्याने हल्ला यावर हल्ला चढवला. दरम्यान, पिंजऱ्याचा लोखंडी दरवाजा वाघाच्या जबड्यावर आदळला. यामुळे आधीच जखमी असलेल्या वाघाला आणखी गंभीर दुखापत झाली.
- यानंतर त्वरित प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र कामात टाळाटाळ झाली. तसेच केवळ अंधाराचे कारण पुढे करून हे ऑपरेशन थांबवण्यात आले.
- वाघाला वाचवण्यासाठी जाळही टाकता आला असता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

Intro:चंद्रपुर : अंधाराचे कारण सांगत बचावकार्य थांबविणाऱ्या वनविभागाला वाघाला वाचविण्यात सपशेल अपयश आले. जर योग्य नियोजन आणि प्रयत्न केले असते तर त्या वाघाला नक्कीच वाचवता आले असते असा दावा काही वन्यजीवप्रेमींकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी लोकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, अन्यथा आपण न्यायालयाचे दार ठोठावु असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. वन्यजीवप्रेमींच्या या भूमिकेमूळे वनविभागाच्या एकूण बचावकार्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Body:6 नोव्हेंबरला भद्रावती तालुक्यातील चारगाव खाणीजवळ सकाळच्या सुमारास एक वाघ नदीच्या काठावर दोन दगडांच्या मधात फसला असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. भद्रावती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसकर या सर्वात आधी तिथे पोचल्या त्यानंतर याची सूचना विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे यांना देण्यात आली. तेही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासोबत इको प्रो संस्थेचे बंडू धोत्रे यांच्यासह त्यांची चमू होती. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे हे सुद्धा होते. वाघ जिथे होता तिथे पोचणे कठीण होते. यासाठी वेकोली प्रशासनाने मदत करत सर्व साधने उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला. यानंतर बचावकार्य करणाऱ्या चमूने आधी फटाके फोडले. यामुळे घाबरून वाघ पाण्यात गेला. यानंतर वाघाला पकडण्यासाठी जेसीबीच्या साह्याने पिंजरा सोडण्यात आला. मात्र चवताळलेल्या वाघाने यावर हल्ला चढविला याच दरम्यान पिंजऱ्याचा लोखंडी दरवाजा सोडण्यात आला. तो वाघाला लागला आणि त्याचा रक्तस्त्राव सुरू झाला. शेवटी अंधार पडला असल्याने हे ऑपरेशन थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा वाघ मृतावस्थेत आढळून आला. वाघाच्या या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्रच हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच वनविभागाचे ढिसाळ नियोजन आणि हलगर्जीपणा यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर योग्य प्रयत्न केले गेले असते तर या वाघाला नक्किच वाचविता आले असते असा दावा काही वन्यजीवप्रेमींनी केला आहे. त्यांनी या रेस्क्यू ऑपरेशनबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ह्या प्रश्नांची सविस्तर माहिती त्यांनी मागविली आहे. यासाठी त्यांनी मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांना निवेदन दिले आहे. माहिती न मिळाल्यास या संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी ते न्यायालयात सुद्धा जाणार आहेत. त्यामुळे हे प्रकरण आता चांगलेच तापणार आहे असे दिसून येत आहे.

Conclusion:हे आहेत गंभीर आरोप
-सकाळी माहिती मिळाली असताना या कार्यातील जबाबदारी अधिकारी उशिरा पोचले.
-एकूण परिस्थिती आणि त्यावर उपाय करण्यास बराच उशीर झाला.
-वाघ फटीत अडकला नसून त्याला मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाल्याने तो दोन खडकाच्या मध्ये आला होता. यावेळी त्याच्या बाजूला फटाके फोडण्यात आले. यामुळे तो घाबरला आणि पुन्हा पाण्यात गेला. त्याचे मागचे दोन पाय काम करीत नव्हते. ही बाब रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या कुणाच्याही लक्षात आली नाही.
- याचवेळी थेट त्याच्यावरून पिंजरा सोडण्यात आला यामुळे घाबरून त्याने हल्ला यावर हल्ला चढविला. यातच सोडण्यात आलेला लोखंडी दरवाजा वाघाच्या जबड्यावर आणि हातावर येऊन आदळला. यात आधीच जखमी असलेल्या वाघाला आणखी गंभीर दुखापत झाली.
-त्यामुळे त्वरित प्रयत्न होणे आवश्यक आहे. मात्र पुन्हा प्रयत्न करण्यात आला नाही. त केवळ अंधाराची सबब देऊन हे ऑपरेशन थांबविण्यात आले.
-वाघाला वाचविण्यासाठी जाळही टाकता आला असता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.