ETV Bharat / state

वाघाचा महाराष्ट्र ते ओडिशा प्रवास; चार राज्यं केली पार - चंद्रपुरातील वाघ

Chandrapur Tiger : चंद्रपुरातील वाघ 2000 किलोमीटर प्रवास करुन महाराष्ट्रातून ओडिशापर्यंत पोहोचला. या वाघाला जंगलाजवळ भटकताना लोकांनी पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या वाघानं तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड ओलांडून ओडिशा गाठलंय.

Chandrapur Tiger News
रॉयल बंगाल टायगर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 8:13 PM IST

प्रतिक्रिया देताना वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे

चंद्रपूर Chandrapur Tiger : चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve Project) तसेच चंद्रपुरातील इतर जंगलातील वाघांनी अनेक ठिकाणी स्थलांतर केलं आहे. लगतचे तेलंगाना राज्य असो की, मध्यप्रदेश येथे देखील वाघांनी प्रवास केला आहे. मात्र आता एका वाघाने चक्क ओडिसा राज्य गाठल्याची माहिती समोर आली आहे. सिंदेवाही येथून निघालेल्या या वाघाने तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास करत आणि चार राज्यांचे अंतर पार करत थेट ओडिसामध्ये धडक दिली. याबाबतचे अधिकृत पुष्टी वनविभागाने केली आहे.

वाघाने केला दोन हजार किलोमीटरचा प्रवास : ओडिशाच्या जंगलात 'रॉयल बंगाल टायगर' दिसल्याची माहिती, एका वनअधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. योग्य अधिवास आणि जोडीदाराच्या शोधात वाघ स्थलांतर करतात. मात्र असे करताना काही वाघ शेकडो किलोमीटरचे अंतर पार करतात. यापूर्वी चंद्रपूरातुन स्थलांतर केलेल्या वाघाने मध्यप्रदेश, तेलंगणा राज्य गाठले. त्यांना जाण्यासाठी कॉरिडॉर (दोन जंगलांना जोडणारे उथळ जंगल) असल्यानं, अनेक वाघ तशी भ्रमंती करू शकतात. मात्र ब्रम्हपुरी उपविभागात येणाऱ्या एका वाघाने तब्बल दोन हजार किलोमीटरचे अंतर गाठत चक्क ओरिसा राज्य (Odisha State) गाठलं.

अशी पटली ओळख : वाघांवर नजर ठेवण्यासाठी त्यांना रेडीओ कॉलर लावले जाते. त्यामुळं हा वाघ कुठे स्थलांतर करत आहे याचे रेडिओ संकेत मिळत असतात. परंतु ब्रह्मपुरी जंगलातील या वाघाला रेडिओ-कॉलर नव्हता. मात्र त्याच्या पट्ट्यांच्या पॅटर्नवरून ओडिसात आलेला हा वाघ ताडोबातील जंगलातील असल्याची ओळख पटली. ओरिसा राज्यातील गजपती भागात काही दिवसांपूर्वी एका वाघाने गाईची शिकार केली होती. या भागात वाघ नसल्यानं वनविभागाने कॅमेरा ट्रॅप लावून या वाघाचा शोध घेतला. मात्र कॅमेरात आलेला वाघ हा अनोळखी असल्यानं त्याची ओळख पटविण्यासाठी त्याचा फोटो वाइल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे पाठविण्यात आले. अंगावर असलेल्या पट्ट्यावरून हा वाघ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी 21 असल्याची पुष्टी करण्यात आली.

माणसावर हल्ला केला नाही : या वाघाने पाणवठे, नद्या, शेतजमीन, रस्ते, मानवीवस्ती असे अनेक अडथळे पार करत महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्रप्रदेश आणि ओडिसा राज्याचा प्रवास केला. या दोन हजार किलोमीटरच्या प्रवासात त्याने कोणत्याही प्राण्यावर, माणसांवर हल्ला केल्याची नोंद करण्यात आली नाही. वनअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 'रॉयल बंगाल टायगर'च्या या प्रदीर्घ प्रवासाचा उद्देश स्वत:साठी चांगले क्षेत्र शोधणे हा असावा. मात्र, भुकेपोटी या वाघाने ओडिसातील एका गायीला ठार केल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या वाइल्ड लाईफ इन्स्टिटयूट ऑफ इंडिया या संस्थेने या घटनेला दुजोरा दिला आहे.

त्या वाघाने केले तीन हजार किलोमीटर पार : यापूर्वीही टिपेश्वर येथील वाघ तेलंगणा राज्यात जाऊन पुन्हा महाराष्ट्रात आला होता. त्याने तीन हजार किलोमीटरचा प्रवास केल्याची नोंद आहे. या वाघाला कॉलर आयडी लावली असल्यानं त्याचे वेळोवेळी लोकेशन मिळत होते. शेवटी हा वाघ तीन हजार किलोमीटरचा प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात (Dnyanganga Forest) स्थिरावला होता.

हेही वाचा -

  1. VIDEO : रॉयल बंगाल टायगरचा कॅटवॉक...
  2. चार राज्यांतून 2 हजार किमीचा प्रवास करुन महाराष्ट्राचा 'रॉयल बंगाल वाघ' पोहोचला ओडिशात; वनाधिकारीदेखील पडले कोड्यात!
  3. चंद्रपूर परिसरात वाघाची दहशत; मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने केलं ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.