ETV Bharat / state

चंद्रपुरात धानोरकर समर्थकांकडून भाजप आमदार श्यामकुळेंचा जाहीर सत्कार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण - खासदार बाळू धानोरकर

श्यामकुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून सलग दोन वेळा विजयी झाले आहे. लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी श्यामकुळे यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अनपेक्षीतरित्या काँग्रेसला तब्बल २५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले. त्यामुळे अहीर आणि श्यामकुळेंनाही धक्का बसला होता.

आमदार नाना श्यामकुळे यांचा सत्कार करताना धानोरकर समर्थक
author img

By

Published : Jun 28, 2019, 12:30 PM IST

चंद्रपूर - शहरात आयोजित एका कार्यक्रमात खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांकडून भाजप आमदार नाना श्यामकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीत श्यामकुळेंच्याच विधानसभा मतदारसंघात गेल्या ३० वर्षात पहिल्यांदाच काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

श्यामकुळे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून सलग दोन वेळा विजयी झाले आहे. तसेच ते भाजपचे महानगर अध्यक्षही आहेत. लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार हंसराज अहीर यांनी श्यामकुळे यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, अनपेक्षीतरित्या काँग्रेसला तब्बल २५ हजारांचे मताधिक्क्य मिळाले. त्यामुळे अहीर आणि श्यामकुळेंनाही धक्का बसला होता. मात्र, आता श्यामकुळे 'डॅमेज कंट्रोल' करण्याच्या तयारीला लागले आहेत. याचीच प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आली.

डॉ. सुधाकर अडबाले मित्र परिवार संस्थेच्यावतीने २३ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी मासांहारी तसेच शाकाहारी भोजनावळी उठल्या. याच कार्यक्रमात बंडू धोतरे आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आमदार श्यामकुळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचाही सत्कार केला. मात्र, सत्कार करणारे विदर्भ शिक्षक माध्यमिक संघाचे सुधारकर अडबाले, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष पुरूषोत्तम सातपुते, प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.चेतन खुटेमाटे हे सर्व धानोरकर समर्थक आहेत. त्यांनी बाळू धानोरकरांचा प्रचार देखील केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच हंसराज अहीर यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत.

दरम्यान या कार्यक्रमात उपस्थित अनेक मान्यवरांनी धानोरकर यांचा उघडपणे प्रचार केला होता. सोबतच भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे काही निवडक लोकांनाच या कार्यक्रमासाठी बोलवले होते. त्यामुळे नव्या राजकीय समिकरणाच्या चर्चेला पेव फुटले आहे.

Intro:
चंद्रपूर : राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, ह्या सर्व बाबी आपापल्या सोयीनुसार ठरवल्या जातात असे म्हणतात. याची प्रचिती नुकत्याच एका कार्यक्रमात आली ज्यामध्ये काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांकडून चंद्रपुरचे भाजपचे आमदार नाना श्यामकुळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यामुळे राजकीय चर्चेला पेव फुटला आहे. Body:चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला तब्बल २५ हजारांचे मताधिक्य मिळाले. मागील तीस वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला या मतदार संघात आघाडी मिळाली. या विधानसभा क्षेत्रातून शामकुळे सलग दोनदा विजयी झाले आहे. ते भाजपचे महानगर अध्यक्ष सुद्धा आहे. अहीर यांनी शामकुळे यांच्याकडे ह्या मतदारसंघाची जबाबदारी सोपविला होती. परंतु अनपेक्षित रित्या काँग्रेसला मताधिक्य मिळाले. अहिरांप्रमाणे श्यामकूळेंना देखील हा धक्का होता. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा निवडुन येण्याच्या श्यामकुळेच्या स्वप्नाला हादरा बसला आणि ते आता 'डॅमेज कंट्रोल' करण्याच्या तयारीला लागले. याची प्रचिती नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आली. डॉ. सुधाकर अडबाले मित्र परिवार, चंद्रपूर यांच्या नावाने २३ तारखेला जंगी मेजवानी आयोजित करण्यात होती. मासांहर, शाकाहारी भोजनावळी येथे उठल्या. याच कार्यक्रमात बंडू धोतरे आणि त्यांच्या सहकार्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार शामकुळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांचाही याच कार्यक़्रमात सत्कार करण्यात आला. मात्र सत्कारा करणारे आणि कार्यक़्रमाचे आयोजन करणारे हे धानोरकर समर्थक होते.
धानोरकर यांना विदर्भ शिक्षक माध्यमिक संघाचे सुधारकर अडबाले यांनी जाहीर पाठींबा दिला होतो. पुरूषोत्तम सातपुते धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष आहे. तेही प्रचारात सक्रीय होते. आएमएच्या माध्यमातून प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.चेतन खुटेमाटे यांनीही पाठींबा दिला होता.
या तिघांनी शामकुळेंना पुष्पगुच्छ देवून मंचावर सन्मानित केले. शामकुळेंच्या या सत्कारामुळे अहीर समर्थक चांगलेच अस्वस्थ झाले आहेत. या कार्यक़्रमात उपस्थित बहुसंख्य मान्यवरांनी धानोरकर यांचा उघडपणे प्रचार केला होता. सोबतच भाजपचे कार्यक़र्तेही मोठ्या संख्येत येथे उपस्थित होते. विशेष म्हणजे काही निवङक लोकांनाच या कार्यक़्रमासाठी बोलविले होते. त्यामुळे नव्या राजकीय समिकरणाच्या चर्चेला पेव फुटला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.