ETV Bharat / state

Chandrapur House Caved चंद्रपुुरात जमिनीवरचे अख्खे घर गेले 50 फुटांच्या खाली, पाहा घुग्गुसमधील थरारक व्हिडिओ - घुगूस जमिनीवरचे घर गेले 50 फुटांच्या खाली

घुग्गुस ghuggus in chandrapur शहर हे भूमिगत कोळसा खाणीच्यावर वसलेले आहे. घर जमिनी खाली Chandrapur House Caved जाण्याची घटना ज्यावेळी घडली व त्यानंतर अमराई वार्डात कंपन सुरू होते. जणू काय परिसरात भूकंपाचे झटके आले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या मोठी दुर्घटना घडू नये यासाठी अमराई वार्ड खाली करीत तिथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.

a house caved in 50 feet land at ghuggus in chandrapur
चंद्रपुुरात बघता बघता जमिनीवरचे एक घर गेले 50 फुटांच्या खाली
author img

By

Published : Aug 27, 2022, 6:37 AM IST

Updated : Aug 27, 2022, 10:29 AM IST

चंद्रपूर इंग्रजकालिन कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध असलेल्या घुग्गुस ghuggus in chandrapur शहरात जी घटना घडली त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिक दहशतीखाली आले आहे. शुक्रवारी शहरातील अमराई वार्डातील गज्जू मडावी हे कुटुंबासाहित घरी असताना अचानक घराच्या आत एक लहान खड्डा पडला आणि झपाट्याने त्या खड्ड्याचा आकार मोठा होत गेला. काही भयानक होणार हे कळताच गज्जू आपल्या कुटुंबासाहित घराबाहेर निघाले आणि एका क्षणात घर जमिनीच्या आत कोसळले Chandrapur House Caved. याच परिसरात इंग्रजांच्या काळातील भूमिगत कोळसा खाण होती. आता हे एक घर जमिनीखाली गेल्याने या परिसरातील नागरिकांत मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे, तसेच काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असल्याची माहिती आहे. ही घटना कॅमेरात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जमिनीवरचे अख्खे घर गेले 50 फुटांच्या खाली, पाहा घुग्गुसमधील थरारक व्हिडिओ

भूमिगत कोळसा खाणीवर वसलेले शहर इंग्रजांच्या काळात घुग्गुस येथे रोबर्टसन इन्कलाईन भूमिगत कोळसा खाण होती. देश स्वतंत्र झाल्यावर 1981 ला त्या खाणीला खुल्या मध्ये परावर्तित करण्यात आले. खुल्या खदाणीतून कोळशाचे उत्खनन करण्यात आले होते. त्यावेळी शहराचा विस्तार ही वाढला. नागरिकांनी खाणीच्या जवळ घरे बांधली. आजच्या स्थितीत संपूर्ण घुग्गुस शहर हे भूमिगत कोळसा खाणीच्यावर वसलेले आहे. घटना ज्यावेळी घडली व त्यानंतर अमराई वार्डात कंपन सुरू होते. जणू काय परिसरात भूकंपाचे झटके आले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या मोठी दुर्घटना घडू नये यासाठी अमराई वार्ड खाली करीत तिथे राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. सदर माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-यांना महत्वाच्या सूचना केल्या आहे. यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

चंद्रपुुरात जमिनीवरचे अख्खे घर गेले 50 फुटांच्या खाली

भूसंशोधन तज्ज्ञ दाखल यामागचं नेमकं शास्त्रीय कारण काय हे अजून ठोसपणे कुणालाही कळू शकले नसले. तरी याबाबतची तज्ञ टीम शोध घेत आहे. यासंदर्भात कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने आजूबाजूच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र या घटनेची भयानता कॅमेरात कैद झाली आहे आणि त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Last Updated : Aug 27, 2022, 10:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.