ETV Bharat / state

शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र; शिवसेनेला हव्यात विधानसभेच्या 169 जागा

सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी राज्यात मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत १९९५च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव पुढे केला आहे. विधानसभेच्या १६९ जागांसाठी शिवसेना अडून बसली आहे.

जागा वाटप चर्चा
author img

By

Published : Feb 12, 2019, 12:21 PM IST

मुंबई - देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अद्याप युतीचा तिढा सुटला नाही. यामुळे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी राज्यात मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव पुढे केला आहे. विधानसभेच्या १६९ जागांसाठी शिवसेना अडून बसली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या वाटेला आलेल्या अपयशामुळे भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत युतीसाठी मध्यस्थी केली होती. त्यातच सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव यांना फोन करुन जागावाटपाची चर्चा केली. शाह यांचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र, लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी भूमिका उद्धव यांनी घेतली आहे. त्यासाठी उद्धव यांनी १९९५ चे जागावाटप सूत्र मांडले. त्यावेळी शिवसेनेने १६८ तर भाजपने ११६ जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी १३८ जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असणार आहे.

undefined

युतीसाठी लोकसभेचे जागावाटप कसे असेल, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ १२२ असताना ९५च्या जागावाटप सूत्रानुसार हा पक्ष ११६ जागा लढवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आपणच मोठे भाऊ आहोत, या भूमिकेपासून आपण हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

Intro:जागावाटपाबाबत शिवसेनेचे भाजपवर दबावतंत्र
शिवसेनेला हव्यात विधानसभेच्या 169 जागा,95 च्या सूत्रावर अडून बसली शिवसेना
मुंबई - देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना अद्याप युतीचा तिढा सुटला नाही. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी राज्यात मोठय़ा भावाचा आग्रह कायम ठेवत 1995 च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव पुढे केला आहे. विधानसभेच्या 169 जागांसाठी शिवसेना अडून बसली आहे. Body:पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या वाटेला आलेल्या अपयशामुळे भाजपने मित्रपक्षांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू केलेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेत युतीसाठी मध्यस्थी केली होती. त्यातच सोमवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव यांना फोन करून जागावाटपाची चर्चा केली. शहा यांचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह आहे. मात्र, लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी भूमिका उद्धव यांनी घेतलीय. त्यासाठी उद्धव यांनी 1995 चे जागावाटप सूत्र मांडले. त्यावेळी शिवसेनेने 168 तर भाजपने 116 जागा लढवल्या होत्या. त्या निवडणुकीत शिवसेना-भाजप या पक्षांनी 138 जागा जिंकून युतीचे पहिले सरकार राज्यात स्थापन केले होते. जागावाटपाच्या या सूत्रानुसार राज्यात युतीचे सरकार आले तर मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेचाच दावा असणार आहे. यामुळे भाजपच्या खासदारांच्या संख्येतही मोठ्या संख्येने घट होईल.Conclusion:युतीसाठी लोकसभेचे जागावाटप कसे असेल, हे अद्याप निश्चित नाही. मात्र, राज्याच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ 122 असताना 1995 च्या जागावाटप सूत्रानुसार हा पक्ष 116 जागा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच आपणच मोठे भाऊ आहोत, या भूमिकेपासून आपण हटणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्यामुळे जागा वाटपाचा तिढा कायम आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.