ETV Bharat / state

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा डोहात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ - मलकापुरात डोहात बुडून मुलींचा मृत्यू

शहरातील उघडा मारुती जवळील खदानमधील डोहात अनेक महिला कपडे धुण्यासाठी जातात. आज सकाळी म्हाडा कॉलनीतील तीन मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी पाणी घेताना शुभांगी दुतोंडेचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी बाजुला बसलेली कांचन बामंदेने प्रयत्न केला. मात्र या दोघीही डोहात बुडाल्या.

Malkapur
मुलींना पाण्यात शोधताना नागरिक, तर बाजुला झाकलेले चिमुकल्यांचे मृतदेह
author img

By

Published : Jul 3, 2020, 6:03 PM IST

Updated : Jul 3, 2020, 6:31 PM IST

बुलडाणा - खदानीतील डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मलकापूर शहरातील उघडा मारुती जवळील खदानीत आज सकाळी घडली. माडा कॉलनी येथील कांचन बामंदे ( वय 14 वर्ष ) तर शुभांगी दुतोंडे ( वय 10 वर्ष ) असे मृत मुलींचे नाव आहे. घडलेल्या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा डोहात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

मलकापूर शहरातील उघडा मारुती जवळील खदानमधील डोहात अनेक महिला कपडे धुण्यासाठी जातात. आज सकाळी म्हाडा कॉलनीतील तीन मुली कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी पाणी घेताना शुभांगी दुतोंडेचा पाय घसरुन ती पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी बाजुला बसलेली कांचन बामंदेने प्रयत्न केला. मात्र या दोघीही डोहात बुडाल्या. दरम्यान 10 वर्षीय नेहा वानखेडेने ही परिस्थिती पाहून आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिकांनी या डोहाजवळ धाव घेतली. बुडालेल्या दोन्ही मुलींना नागरिकांनी बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मुलींच्या मृतदेहांना मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

Last Updated : Jul 3, 2020, 6:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.