बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा कहर कमी होत नाही, तोच दुसऱ्या गंभीर आजाराने तोंड वर काढले आहे. म्यूकरमायकोसिस या नवीन आजाराची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, आजपर्यंत जिल्ह्यात म्यूकरमायकोसिसचे 36 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 17 रुग्णांवर सद्या उपचार सुरू असल्याची माहिती निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी यानी दिली आहे.
बुरशीजन्य हा आजाराची म्यूकरमायकोसिस या नावाने प्रचलित आहे. ज्यांना कोरोना होऊन गेलाय आणि मधुमेह आहे अशा व्यक्तींना हा आजार जडत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
हेही वाचा - देवेंद्र फडणवीस आणि माझी कोणतीही गुप्त बैठक झाली नाही; उदय सामंतांचे स्पष्टीकरण
जिल्हा सामान्य रुग्णालयात म्यूकरमायकोसिस रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष-
जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस या आजाराची रुग्णसंख्या वाढत चालली असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या आजाराच्या उपचारासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये केले असले तरी या रुग्णांच्या उपचारासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध नसल्याने प्राथमिक उपचार करुन रुग्णांना इतर जिल्ह्यात रेफर केले जात आहे. अतिखर्चिक आजार असल्याने काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करुन उपचार घेण्याचे आवाहनसुद्धा कान-नाक-घसा वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुशील चव्हाण यांनी केले आहे. कोविड सपोर्ट आजार असल्याने तोंडावर लावलेला मास्क दररोज स्वच्छ धुऊन मगच वापरावा, असे आवाहन देखील यावेळी नागरिकांना करण्यात आले आहे.
हेही वाचा - अन् रोहित पवार झाले सैराट..कोविड सेंटरमध्ये झिंगाटवर केला अफलातून डान्स