ETV Bharat / state

बुलडाण्यात आघाडी आणि युतीत तुल्यबळ लढत; वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक - युती

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही उमेदवारांवर अवलंबून असते. उमेदवार घाटा वरचा की घाटा खालचा आहे? यावरही निवडणूक अवलंबून असते.

डॉ. राजेंद्र शिंगणे, बळीराम शिरस्कार, प्रतापराव जाधव
author img

By

Published : Mar 29, 2019, 8:17 AM IST

बुलडाणा - लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा मतदारसंघ समजला जातो. यावेळी या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा-आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत.

बुलडाणा लोकसभा मतदारसंघ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थळ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही उमेदवारांवर अवलंबून असते. उमेदवार घाटा वरचा की घाटा खालचा आहे? यावरही निवडणूक अवलंबून असते. निवडणुकीत नात्या- गोत्यातील मुद्दे अग्रक्रमाने मांडले जातात. शिवाय जातीपातीचे राजकारणही मोठ्या प्रमाणात होते.

मराठा-माळी समाजाची निर्णायक मते
बुलडाणा लोकसभेमध्ये मराठा-माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. घाटावर मराठा समाजाचे मतदान तर घाटाखाली माळी समाजाचे मतदान आहे. लोकसभा काबीज करण्यासाठी घाटाखालील मतदानाची आवश्यकता असते.

२०१४ ची राजकीय परिस्थिती

२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र शिंगणे यांचा २८ हजार मतांनी पराभव केला होता. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव हे मोदी लाटेत जवळपास ५ लाख ९१ हजार ४५ मते मिळून दुसऱ्यांदा निवडूण आले होते. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळे यांचा १ लाख ५९ हजार ५७९ मतांनी पराभव केला होता. २०१४ ला काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार कृष्णराव इंगळे हे माळी समाजाचे होते तर २००९ साली काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे मराठा समाजाचे होते. पण मराठा समाजामध्ये मतांची विभागणी झाली आणि भाजप शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे निवडूण आले. प्रतापराव जाधव आणि शिंगणे हे दोन्ही मराठा समाजाचे नेते असले तरी एकमेकांचे नातेवाईकसुद्धा आहेत. या लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदार हे मोठ्या प्रमाणावर असल्याने लोकसभेमध्ये मराठा उमेदवार हा निवडून येण्याची दाट शक्यता असते.

६ विधानसभा मतदारसंघात सेना भाजपचे वर्चस्व आहे

बुलडाणा जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघ असून लोकसभेसाठी ६ विधानसभा मतदारसंघ येतात. यातील मलकापूर हा रावेरमध्ये जातो. जिल्ह्यात शिवसेनेचे २ आमदार आहेत. सींदखेड राजामध्ये शशिकांत खेडेकर हे आमदार आहेत. तर मेहकरमध्ये संजय रायमूलकर हे आमदार आहेत. भाजपकडे ३ आमदार आहेत. ज्यामध्ये मलकापूरमध्ये चैनसुख संचेती, खामगावचे अॅड. आकाश फुडकर, जळगाव जामोदमध्ये संजय कुटे हे आमदार आहेत. तर काँग्रेसचे २ आमदार आहेत. बुलडाण्यामध्ये आमदार हर्षवर्धन सपकाळ आणि चिखलीमध्ये आमदार राहुल बोन्द्रे हे आमदार आहेत. विशेष म्हणजे बुलडाणा लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात सध्या बॅकफूटवर आहे. तर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सर्वेसर्वा डॉ. राजेंद्र शिंगणे यांना विधानसभेला तिकीट न मिळाल्याने ते सध्या आमदार नाहीत.

प्रतापराव जाधवांना गटबाजीचा फटका बसू शकतो

यावर्षी खासदार प्रतापराव जाधव यांच्याबाबत लोकांमध्ये नाराजीचे सूर आहेत. तर खासदार जाधव यांना शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीचाही फटका असू शकते. बुलडाणा लोकसभा काबीज करण्यासाठी घाटाखालील लोकांच्या लीडची आवश्यकता असते. ती लीड गटबाजीमुळे थांबण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

खासदार जाधवांनी केलेली कामे

शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे मागील १० वर्षांपासून बुलडाण्याचे खासदार आहेत. त्यांनी मागील ५ वर्षाच्या कार्यकाळात ७ हजार कोटींची नॅशनल हायवेची कामे मंजुर करुन आणली आहेत. ३ जिल्ह्यांना जोडणारा शेगाव रेल्वे उड्डाणपूल केला आहे. जिगाव प्रकल्प हा बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये समावेश करून घेतला आहे. शेगाव ते पंढरपूर हा रास्ता गजानन महाराजांच्या पालखीसाठी मंजूर करून घेतला. खडकपूर्णा प्रकल्पाला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून घेतले आहे. शेगाव रेल्वे स्थानक विकास करायला सुरुवात केली आहे.

मतदारसंघातील प्रश्न

बुलडाणा जिल्ह्यातील जीगाव सिंचन प्रकल्प अद्यापही अपूर्णच आहे. शेगाव विकास आराखडा सारखाच राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या सिंदखेडराजा विकास आराखडा पूर्ण व्हावा ही जिजाऊ भक्तांची इच्छा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सिंदखेडराजाला येऊन माँ जिजाऊ साहेबांच्या विकास आराखड्याचे उद्घाटन केले व विकास आराखड्याला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. अमरावती विभागातून बुलडाण्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयाची सुविधा नाही. कृषीवर आधारित कोणतेही प्रक्रिया उद्योग नाहीत. शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणजे जिल्हा सहकारी केंद्रीय बँक ही अवसानात निघाली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. मागील वर्षी नाफेडला विकलेल्या मालाचे अद्यापही चुकारे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, लोणार या तालुक्यातील दुर्गम गावातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सूचनेवरून खासदार दत्तक ग्राम योजनेअंतर्गत मतदारसंघातील एक गाव सर्वसोयीयुक्त करण्याचा संकल्प होता. मात्र, परिस्थिती जैसे थे अशीच आहे.

जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी-भाजपची युती

बुलडाणा लोकसभेची मूळ जागा काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यावर शेतकऱ्यांची जिल्हा बँक बुडवल्याचा ठपका आहे. मात्र, मराठा समाजातील शांत आणि संयमी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तर स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ म्हणजे रविकांत तुपकर हेदेखील बुलडाणा लोकसभेसाठी आघाडीकडून इच्छित होते. मात्र, जागा न सुटल्याने त्याना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत काम करावे लागेल. जिल्हा परिषदमध्ये राष्ट्रवादी-भाजपची अभद्र युती आहे. ऐन लोकसभेच्या वेळी काँग्रेसनेच आघाडीचा धर्म का पाळावा ? कारण जिल्हा परिषदमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचे काम राष्ट्रवादीने केले आहे. त्यामुळे काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार का प्रश्न उपस्थित होत आहे. तसा टोमणा देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे आमदार राहुल बोंद्रेनी काँग्रेसच्या बैठकीत शिगणेंना लगावला होता.

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आमदार बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी दिली आहे. शिरस्कार हे माळी समाजाचे असून ते अकोला जिल्ह्याचे बाळापूर येथील आहेत. त्यांना दलित-माळी-मुस्लिम मतदार किती मदत करतील हा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या सभेला अलोट गर्दी होत आहे. आमदार बळीराम शिरस्कार यांची मतेही निर्णायक ठरणार हे मात्र नक्की.

Intro:Body:

who, will, won,  buldhana, loksabha, seat, Rajendra shingane, prataprao jadhav, baliram shiraskar

who will won the buldhana loksabha seat

बुलडाण्यात आघाडी आणि युतीत तुल्यबळ लढत; वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक

वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार म्हणून अॅड. प्रकाश आंबेडकरांनी आमदार बळीराम शिरस्कार यांना उमेदवारी दिली आहे. शिरस्कार हे माळी समाजाचे असून ते अकोला जिल्ह्याचे बाळापूर येथील आहेत. त्यांना दलित-माळी-मुस्लिम मतदार किती मदत करतील हा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या सभेला अलोट गर्दी होत आहे. आमदार बळीराम शिरस्कार यांची मतेही निर्णायक ठरणार हे मात्र नक्की. बुलडाण्याची जनता  डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पारड्यात आपला कौल टाकते की प्रतापराव जाधव यांच्या हा येणार काळच ठरवेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.