ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात 15 दिवसांसाठी लॉकडाऊन सदृश्य स्थिती, पालकमंत्री शिंगणेंची माहिती

अनलॉकनंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसांसाठी लॉकडाऊनसदृश्य स्थिती निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी दिली. 18 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Dr.Rajendra Shingne
डॉ.राजेंद्र शिंगणे
author img

By

Published : Sep 16, 2020, 5:04 PM IST

Updated : Sep 16, 2020, 5:42 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता व कोरोनाची साखळी तोडण्याकरिता बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवसांसाठी लॉकडाऊन सदृश्यस्थिती निर्माण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिगणें यानी दिली. यावेळी त्यांच्यासोबत बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी सांगळे उपस्थित होते.

डॉ.राजेंद्र शिंगणे

अनलॉक झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव बुलडाणा जिल्ह्यात वाढत आहे. नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिगंचे पालन होत नाही, तसेच मास्कचा वापर केला जात नाही. समारंभात मोठ्या प्रमाणत गर्दी होताना दिसत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, असे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.

हेही वाचा-पार्टी करण्यासाठी नदीवर गेलेला शाळेतील शिपाई पोहताना बेपत्ता, शोधकार्य सुरू

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या 5 हजार 254 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात येत्या 18 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबर पर्यंत 15 दिवसाचा लॉकडाऊन सदृश्य स्थिती निर्माण करण्याचा निर्णय घेतल्याचे शिंगणे यांनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहनानुसार 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

15 दिवसांच्या कालावधीमध्ये पूर्वीप्रमाणे आवश्यक सेवांना वेळ देण्यात येणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना 500 रुपये दंड आकारण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.

Last Updated : Sep 16, 2020, 5:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.