बुलडाणा - पंढरपूरातील आषाढी एकादशीच्या सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेली गजानन महाराजांची पालखी पंढरपुरहून ६१ दिवसांचा पायी प्रवास करत आज (मंगळवारी) माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी लाखो भावीक आले आहेत. त्यामुळे खामगाव ते शेगाव महामार्गावरील वाहतुक १२ तास बंद ठेवण्यात आली आहे.
विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी ६ जून रोजी सकाळी टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्त झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील ५१ वर्षांपासून अविरत सुरू आहे. वारीचे यंदा ५२ वे वर्षे होते. पालखी एकूण ६१ दिवसांचा पायी प्रवास आणि ७५० किमीचे अंतर कापूर १० जुलै रोजी पंढरपुरमध्ये दाखल झाली. तर तेथून १६ जुलै रोजी पpalaरतीचा प्रवासाला प्रारंभ करत पुन्हा सुमारे ५५० किमीचा पायी प्रवास केल्यानंतर आज ६ ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे.
यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. अनेक भक्तांनी पालखीवर पृष्पवृष्टी केली. महिलांनी पालखीच्या मार्गात सडा-समार्जन करुन आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. पालखीचे नगर परिक्रमानंतर सायंकाळी आरती आणि रिंगण सोहळा पार पडला.