Buldhana News : मुलीला वाचवण्यासाठी आईने घेतली विहिरीत उडी ; मात्र आईचा दुर्दैवी अंत... - A 14 year old girl fell into a well
विहिरीवर पाणी काढताना विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करणार्या आईचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू ( Mothers Unfortunate Death ) झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा येथे घडली आहे. तर मुलीने विहिरीतील कडा पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली आहे.( Mother Jumped Into The Well To Save Daughter )
बुलढाणा : शेतातील विहिरीमध्ये पाणी काढताना तोल गेल्याने 14 वर्षीय मुलगी विहिरीत पडली. ( 14-year old girl fell into a well ) दरम्यान क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. परंतु दुर्दैवाने खोल तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर मुलगी सुदैवाने वाचली. ही गंभीर घटना खामगाव तालुक्यातील कोंटी येथे घडली असून बेबीबाई उमा खताळ, वय ४० असे मृत आईचे नाव आहे.( Mother Jumped Into The Well To Save Daughter )
मुलगी सुदैवाने वाचली : बेबीबाई खताळ ह्या आपल्या मुलीला घेऊन सकाळी शेतात गेली होती. दरम्यान 14 वर्षीय कुमारी आकांक्षा ही विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक तिचा तोल जाऊन पाण्यात पडली.मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आईने मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कुठलाही विचार न करता आईने उमा खताळ विहिरीत उडी घेतली. पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या.यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. दरम्यान मुलगी आकांशा ने विहिरीतील कडा पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली.आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ( Unfortunate Mother Death In Buldhana )
3 वर्षीय मुलगा विहिरीत बुडत होती : या आधीही 29 ऑक्टोबर रोजी कोल्हापुरातील दानोळी भागातील एक धक्कादायक घटना घडली होती. एक 3 वर्षीय मुलगा विहिरीत बुडत होता. मात्र याच वेळी भल्या भल्या मोठ्या लोकांना जे करता आले नाही, ते एका 15 वर्षीय मुलीने करून दाखवले. 'त्या' मुलाचा जीव वाचवला होता. नम्रता कलगोंडा कटारे, असे या मुलीचे नाव असून क्षणाचाही विचार न करता तिने खोल आणि कटोकाट भरलेल्या विहिरीत उडी घेत त्या मुलाचा जीव वाचवला आहे.(15 year old girl saved 3 year old boy)