ETV Bharat / state

पोटच्या मुलाचा गळा चिरून पित्याचा आत्महत्येचा प्रयत्न, बुलडाण्यातील घटना

अनेकदा पती-पत्नीच्या वादात मुलांचा जीव धोक्यात पडतो. भांडणाचा राग मुलांवर काढला जातो. बुलडाण्यात अशीच एक घटना घडली. वादातून बापाने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

crime
क्राईम
author img

By

Published : Oct 5, 2020, 7:04 PM IST

बुलडाणा - पत्नी नांदण्यासाठी येत नाही या वादातून बापाने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला गळा चिरून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मेहकर तालुक्यातील भालेगाव फाटा येथे घडली. पोलिसांनी तत्काळ दोघांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अनिल अवसरमोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोळी गावातील आरोपी अनिल अवसरमोल गेल्या सहा महिन्यापासून त्याच्या पत्नीपासून वेगळे राहत होता. अनिल हा आपल्या मुलासह रविवारी सारसवाडी गोमेधर येथे पत्नीला घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच्या सोबत येण्यास पत्नीने नकार दिला. त्यानंतर अनिल याने भालेगाव फाटा येथे रस्त्यात आपल्या तीन वर्षीय मुलाचा गळा चिरून त्याला जखमी अवस्थेत जानेफळ पोलीस स्टेशन मध्ये नेले व स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.