बुलडाणा : आरोपीने व्हाट्सअपवर ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून देखील या युवकाने आपल्या मित्राच्या साहय्याने ही खंडणी मागितली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत या युवकाला त्याच्या मित्रासह अटक केली आहे. दिल्ली येथील गॅंगस्टर थेट बुलडाणा येथील एकाला खंडणी मागतो. त्यामुळे शहरात एकच खळबळ माजली होती. मात्र या पोलीस कारवाईनंतर शहरवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
काय घडला घटनाक्रम - बुलडाणा शहरातील केशवनगर भागात वास्तव्यास असलेले 'म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर' पंकज अरुण खर्चे (वय 42 वर्षे) यांच्या मोबाईलवर ८ जुलैच्या सायंकाळी ५.३५ वाजताच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता. मला तुझी सगळी कुंडली माहीत आहे. मला ४० लाख रुपये दे. तू जर पैसे दिले नाही, तर मी तुझा गेम करून टाकीन, अशी धमकी दिली. दरम्यान ९ जुलैच्या सकाळी ६.१५ वाजता दरम्यान त्यांच्या कारचा काच फुटलेला दिसला. तसेच कारजवळ दोन दगडाखाली ठेवलेली एक धमकीची चिठ्ठीही दिसली.
कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी : पंकज खर्चे यांनी चिठ्ठी वाचून पाहिली असता, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देणारा हिंदीत संदेश होता. या प्रकरणी त्यांनी बुलडाणा शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा पुढील तपास ठाणेदार काटकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत होते. या प्रकरणाबाबत ठाणेदारांनी संपूर्ण माहिती दिली होती.
गुन्ह्यासाठी डिजिटल मार्गाची निवड : या घटनेमध्ये आरोपींनी यु-ट्यूब या डिजिटल माध्यमाचा धमकी देण्याकरता वापर केल्याचे सांगितले. आरोपींमध्ये आदित्य कोलते हा आरोपी पंकज खर्चे यांचा मावस पुतण्या आहे. तर दुसरा मित्र ऋषिकेश शिंदे याला सहआरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. एकंदरीत या हाय-प्रोफाईल धमकी प्रकरणात आरोपींनी डिजिटल मार्गाची साथ घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपी जेरबंद करण्यात आले असून त्यांनी गुन्ह्यांत वापरलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. नमूद आरोपींनी यु-ट्यूबवरून गुन्ह्यांची कार्यपध्दती जाणून घेऊन त्याप्रमाणे गुन्हा केल्याचे कबूल केले.
हेही वाचा: