ETV Bharat / state

बुलडाण्यात नव्याने आढळले 17 कोरोनाबाधित रुग्ण, तर 10 रुग्णांची कोरोनावर मात..

बुलडाणा जिल्ह्यात आजअखेर एकूण 377 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 215 कोरोनाबाधीत रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 147 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Newly found 17 corona-infected patients in Buldana
बुलडाण्यात नव्याने आढळले 17 कोरोनाबाधीत रुग्ण
author img

By

Published : Jul 9, 2020, 9:24 PM IST

बुलडाणा : जिल्ह्यात पुन्हा नव्याने 17 कोरोनाबधित रुग्ण आढळले असून 10 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटदद्ववारे तपासलेल्या अहवालांपैकी आज गुरुवारी 9 जुलै रोजी 148 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 13 1 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत

पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 16 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 80 तर रॅपिड टेस्टमधील 51 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 131 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझिटिव्ह अहवालामध्ये रामनगर नांदुरा येथील 33 वर्षीय पुरूष, बारादरी मलकापूर येथील 32 वर्षीय महिला, मलकापूर येथील 25 वर्षीय पुरूष, इकबाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरूष, सुरभी कॉलनी शेगांव येथील 22 वर्षीय पुरूष, दाल फैल खामगांव येथील 35 व 47 वर्षीय महिला, टिपु सुलतानपूरा शेगांव येथील 26 वर्षीय पुरूष, आळसणा ता. शेगांव येथील 16 वर्षीय मुलगा, शेलूद ता. चिखली येथील 62 व 45 वर्षीय महिला, 19 वर्षीय मुलगा, चिखली येथील 21 वर्षीय पुरूष, तसेच सिनगांव जहागीर ता. दे. राजा येथील 45 वर्षीय पुरूष, जुना जालना रोड दे. राजा येथील 48 वर्षीय पुरूष, शेगांव रोड खामगांव येथील 55 वर्षीय पुरूष व नॅशनस हायस्कूलजवळ खामगांव येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. शिवाय आज 10 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये पारपेठ मलकापूर येथील 8 वर्षीय मुलगा, अमोना ता. चिखली येथील 30 वर्षीय पुरूष, साखरखेर्डा ता. सिं.राजा येथील 10 वर्षीय मुलगा, 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय महिला, मुळ पत्ता देऊळगाव ता जामनेर जि. जळगांव येथील 65 वर्षीय महिला, शक्तीनगर मलकापूर येथील 75 वर्षीय पुरूष, नांदुरा येथील 28 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 3560 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे आजपर्यंत 215 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तर आज रोजी 219 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2698 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 377 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 215 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 147 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 15 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.