ETV Bharat / state

बुलडाण्यात संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरच्या लावली कानशिलात; गुन्हा दाखल

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाच्या एका शेतकऱ्याने शाखा स्टेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लावल्याचा प्रकार सोमवारी 29 जूनला दुपारी घडला. संबंधित प्रकार बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

buldana crime
बुलडाण्यात संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरच्या लावली कानशिलात; गुन्हा दाखल
author img

By

Published : Jun 30, 2020, 3:55 PM IST

बुलडाणा - लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू गावाच्या एका शेतकऱ्याने शाखा स्टेट बँक मॅनेजरच्या कानशिलात लावल्याचा प्रकार सोमवारी 29 जूनला दुपारी घडला. संबंधित प्रकार बँकेत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी मॅनेजरच्या तक्रारीवरून बिबी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोन्ही शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधितांना अटक करण्यात आली आहे.

बुलडाण्यात संतप्त शेतकऱ्याने बँक मॅनेजरच्या लावली कानशिलात; गुन्हा दाखल
खरीपाचा हंगाम सुरू होऊन काही दिवस लोटले आहेत. तरिही अद्याप किनगाव जट्टू गावच्या शाखा स्टेट बँकेत शेतकऱ्यांना पीककर्ज, पीक विमा देण्याची प्रक्रिया संपली नाहीय. शेतकरी बँकेत चकरा मारून थकले आहेत. अद्याप कर्जाचे काम पूर्ण झाले नाहीय. तसेच बँकेच्या उर्वरित प्रक्रिया देखील खोळंबली आहे. त्यातच शेतकऱ्यांना मॅनेजरकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने संतप्त अशोक विठ्ठल दायमा यांनी बँक मॅनेजर राहूल लटपटे यांच्या कानशिलात लगावली.

संबधित प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मॅनेजर राहुल लटपटे यांच्या तक्रारीवरून अशोक विठ्ठल दायमा व त्यांचे वडील विठ्ठल दायमा या दोन्ही शेतकऱ्यांच्या विरोधात बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ /३३२ /२९४ /५०६ /भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले असून शेतकऱ्यांना अटक करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.