बुलडाणा - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी बुलडाण्यात मतदान आज पार पडले. तब्बल 27 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले आहे. बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र यासाठी तयार करण्यात आले होते. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी बुलडाणा जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रावर मतदान आज पार पडले. आज (मंगळवार) सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती.
जिल्हाधिकारी शंकर राममुर्ती यांनी दिली बुलडाणा मतदान केंद्राला भेट-
मतदार संघासाठी प्रत्येक तालुक्यात एक आणि मतदारांची संख्या जास्त असल्याने बुलडाणा तालुक्यात दोन मतदान केंद्र उभारण्यात आले होते. मतदानासाठी 13 सदस्यांची 14 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक तालुक्यातील तहसीलमध्ये मतदान केंद्र होती. मतदान केंद्रावर आरोग्य विभागाची पथकेही नियुक्त करण्यात आली होती.
प्रत्येक मतदाराचे तापमान व ऑक्सिजन तपासणी करण्यात आले. तसेच कोरोनाबाधित मतदारांना विलगीकरणातून पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी शंकर राममुर्ती यांनी मतदान केंद्राला भेट दिली.
हेही वाचा - शेतकर्यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? निर्णय न झाल्यास केंद्राविरोधात देश पेटवू...