ETV Bharat / state

Dragon Fruit Crop In Drought Area : विदर्भातील शेतकऱ्यांचा नवीन पिकाकडं ओढा; चिखलीत फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती - 14 एकर शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड

Dragon Fruit Crop In Drought Area : चिखलीसारख्या दुष्काळग्रस्त परिसरातील शेतीत ड्रॅगन फ्रुटची शेती करुन शेतकऱ्यानं नवा आदर्श घालून दिला आहे. या शेतकऱ्याला आता लाखो रुपयाचं उत्पादन होणार असल्याची अपेक्षा ईटीव्ही भारतकडं व्यक्त केली आहे.

Dragon Fruit Crop In Drought Area
ड्रॅगन फ्रुट दाखवताना शेतकरी सतीश गुप्त
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 2:43 PM IST

Updated : Sep 20, 2023, 6:53 AM IST

25 वर्षे शाश्वत उत्पादन देणारी शेती

बुलडाणा Dragon Fruit Crop In Drought Area : विदर्भातील कोरडवाहू तसंच आत्महत्याग्रस्त समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळे प्रयोग करत आहेत. उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथल्या प्रगतशील शेतकरी सतीश गुप्त यांनी औषधी गुणधर्म असणाऱ्या ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे. या पिकातून लाखो रुपये उत्पन्न घेत सतीश गुप्त यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

Dragon Fruit Crop In Drought Area
चिखलीत फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती

चिखलीत 14 एकर शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड : चिखलीतील प्रगतशील शेतकरी सतीश गुप्त यांनी आपल्या 14 एकर शेतात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. खडकाळ जमिनीला सरळीकरण करत शेतकरी सतीश गुप्त यांनी रासायनिक खतं टाळून, फक्त शेणखताच्या जोरावर ड्रॅगन फ्रुटची शेती केली. शेतकरी गुप्त यांनी बाहेरून ड्रॅगन फ्रूटची रोपं आणून त्याचं मागील तीन वर्षांपासून चांगलं संगोपन केलं. पाणी कमी लागत असल्यानं त्याला इतर खर्च सुद्धा कमी लागला. मात्र याला लागवडीपासून तर आतापर्यंत त्यांना एकरी पाच लाख रुपये खर्च आला असून आता उत्पादन सुरू झालं आहे.

Dragon Fruit Crop In Drought Area
चिखलीत फुलली ड्रॅगन फ्रुटची शेती

ड्रॅगन फ्रूट शेतीतून एकरी सहा टन उत्पादन : या बहरलेल्या ड्रॅगन फ्रूट शेतीतून या हंगामात सुमारे पाच ते सहा टन एकरी उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीद्वारे पुढील 25 वर्षे शाश्वत उत्पादन त्यांना मिळणार असल्याचा विश्वास सतीश गुप्त यांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात त्यांना 90 ते 100 रुपये किलो दर मिळत असून लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांना ड्रॅगन फ्रूट शेतीतून मिळत आहे.

कमी पाणी असलेल्या शेतीत पीक जोरात : कमी पाणी असलेल्या भागात हे पीक जोमात येत असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्या भारतात ड्रॅगन फ्रूट हे पीक अंदमान निकोबार बेट, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, गुजरात राज्यामध्ये चांगलं होतं. यापासून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळतं, म्हणून या शेतीचा प्रयोग शेतकरी सतीश गुप्त यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी डाळिंबची शेती केली आहे. त्यापासून चांगलं उत्पन्न त्यांनी घेतलं, मात्र त्यावर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं डाळिंब शेती बंद केली आणि आता ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग केला आहे. ज्यांच्याकडं पाणी कमी आहे, अशा शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट लागवड करून आपलं उत्पन्न वाढवावं, असं आवाहनही सतीश गुप्त यांनी केलं आहे.

माती परीक्षण करुन पीक घेणं आवश्यक : मागील अनेक वर्षापासून बळीराजाला निसर्गाच्या प्रकोपाला सामोरं जावं लागतं. त्यातच प्रत्येक वेळेस सरकारच्या मदतीची वाट पाहावी लागते. एक संकट संपत नाही तर दुसरं संकट बळीराजा समोर उभं असतं. त्यासाठी नवनवीन प्रयोग करणं हे आता काळाची गरज बनली आहे. शेतकऱ्यांनी आता माती परीक्षण, निसर्गाचा बदल आणि आपल्या जमिनीची पोत याबाबत अभ्यास करून इतर राज्यात कशा पद्धतीनं शेती केली जाते, याचा आता विचार करणं गरजेचं आहे. सोबत जोडधंदा करत शेतात घेतलेल्या उत्पादनांना आपल्या परिसरात थेट बाजारपेठ उपलब्ध होईल, या धर्तीवर शेती करणं आवश्यक असल्याचं सतीश गुप्त यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Dragon Fruit Farming : नंदुरबारमधील शेतकऱ्याने केली ड्रॅगन फ्रूटची शेती, मिळवले तब्बल १५ लाखांचे उत्पन्न

Last Updated : Sep 20, 2023, 6:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.