बुलढाणा : चिखली शहराला लागूनच असलेल्या भानखेड येथे गेल्या तीन आठवड्यापासून डेंग्यू सदृश्य तापाची लागण लहान मुले तसेच वयस्कर व्यक्तींना झाली आहे. रुग्णांचा आकडा ५० पर्यंत गेला; त्यातील काही रुग्ण बरे झाले. अद्यापही २५ रुग्ण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. मात्र उपचार सुरू असताना कांचन तारु या २३ वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाला आहे. तसेच एका आठवड्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. सवणा गावात डेंग्यू सदृश तापाचे वीस ते २५ रुग्ण उपचार घेत आहेत.
गावात साथीचा रोग : आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात येऊन गेले आहेत. आरोग्य कर्मचारी दररोज गावात येत आहेत, तरीही हा रोग आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याने चित्र दिसत आहे. तसेच ग्रामपंचायतनेही काहीच उपाययोजना केली नसल्याची गावकऱ्यांनी आरोप केला आहे. गावामध्ये डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. सर्वत्र अस्वच्छतेचे कळस घातला आहे. गावात पाणीटंचाई असल्याने पिण्याची पाणी साठवून ठेवावे लागते. साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये डेंगूसारख्या डासांची उत्पत्ती होत असल्याने गावात साथीचा रोग बळवला आहे.
ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण : डेंगूसदृश्य रोगाने गावातील ऋतुराज इंगळे (वय १० महिने), ओम वाघ (वय १४ वर्षे) या दोन बालकांचा मृत्यू झाला तर १५ जून रोजी दुपारी कांचन सुनील तारू (वय २० वर्ष) या गरोदर महिलेचा या रोगाने मृत्यू झाला. सदर या साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत असून आरोग्य विभागाने अजूनही गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळे या डेंगूसदृश्य साथ रोगांचा प्रादुर्भाव इतरही गावांमध्ये वाढून नागरिकांचे आरोग्य धोका देऊ शकते. त्यामुळे आरोग्य विभाग अजून किती बळी घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात डेंगू सदृश्य तापाची साथ पसरल्याने अनेक रुग्णांची रक्त तपासणी केल्याने तपासणी अहवाल डेंगू पॉझिटिव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :