ETV Bharat / state

Corona: बुलडाण्यात पवित्र रमजान महिना घरातच साजरा करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय.. - buldana muslim decides ramzan celebrate in homes

कोरोनाचे संकट पाहता बुलडाण्यातील मुस्लीम बांधवांनी येत्या २५ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिन्यात आपापल्या घरातच नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला.

buldana muslim decides ramzan celebrate in homes
Corona: बुलडाण्यात पवित्र रमजान महिना घरातच साजरा करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय..
author img

By

Published : Apr 23, 2020, 9:07 AM IST

Updated : Apr 23, 2020, 1:03 PM IST

बुलडाणा - येणाऱ्या २५ एप्रिलपासून सुरू होणारा मुस्लीम समाजाचा पवित्र रमजान महिना या वर्षी कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आपापल्या घरातच साजरा करण्याचा निर्णय बुलडाण्यात घेतला आहे. मुस्लीम समाजाचे मौलवी, मशिदीचे ट्रस्टी, प्रतिष्ठितांनी यासंदर्भात एक बैठक घेवून कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी मशिदीमध्ये एकत्र न होता आपापल्या घरातच नमाज पठण करून पवित्र रमजान महिना साजरा करण्याबाबत ठरविले आहे. याबाबतची माहिती व मशिदीमधून केवळ अजान देण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठी बुधवारी २२ एप्रिल रोजी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस, हाफीस मो. सिद्दीकी, हुसेनिया मस्जिदचे ट्रस्टी हाजी सैय्यद फारुख डोंगरे, हाजी सैय्यद बिलाल डोंगरे, मो. अजहर, अ‌ॅड. राज शेख यांनी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांची भेट घेतली.

Corona: बुलडाण्यात पवित्र रमजान महिना घरातच साजरा करण्याचा मुस्लीम समाजाचा निर्णय..

मुस्लीम समाजात पवित्र रमजान महिन्याला सर्वात जास्त महत्त्व आहे. या महिन्यात पूर्ण एक महिना उपवास (रोजा) ठेवून अल्लाहची प्रार्थना केली जाते. उपवासामध्ये सकाळी 5 वाजेपर्यंत जेवण करून (सहेरी करून) नंतर खाणे-पिणे बंद करून दिवसभर उपाशी राहून प्रार्थना करतात आणि संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटानंतर उपवास सोडतात. तर सगळे मुस्लीम बांधव एकत्र येऊन दिवसभरातील ५ वेळेची मस्जिद मध्ये नमाज पठण करून दुआ मागतात. दररोज रात्री तराबीची विशेष नमाजाचे पठण केले जाते. मात्र, यावर्षी असलेल्या कोरोनाचे संकट पाहता मुस्लिम बांधवांनी येत्या २५ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या पवित्र रमजान महिण्यात आपापल्या घरातच नमाज पठण करून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

मुस्लिम समाजाकडून बोलवण्यात आलेल्या बैठकीत हाफीस मो. सिद्दीकी, हुसेनिया मशिदीचे ट्रस्टी हाजी सैय्यद फारुख डोंगरे, मोती मशिदीचे ट्रस्टी हाफिज खान, हाजी सैय्यद बिलाल डोंगरे, मो. अजहर, अ‌ॅड. राज शेख यांच्यासह अनेकांच्या व माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती होती. बुलडाणा शहरातील जामा मशीद, मोती मशीद, हुसेनिया मशीद, तकवा मशीद, इकबाल नगर मधील मदीना मशीद, इंदिरा नगर मधील मदीना मशीद आणि मोहम्मदिया मशिदीत एकत्र न येता आपापल्या घरातच नमाज पठण करून पवित्र रमजान महिना साजरा केला जाईल, असा निर्णय घेतला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याही मशिदीमध्ये नमाज पठण करणे बंद आहे.

Last Updated : Apr 23, 2020, 1:03 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.