ETV Bharat / state

बुलडाण्यात पुन्हा आढळले तीन नवीन कोरोनाबाधित रुग्ण - जागतिक आरोग्य आणीबाणी

जिल्ह्यात ३ नवे रुग्ण आढळल्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या २८ वर गेली आहे. २३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. नव्या रुग्णांमध्ये नरवेल येथील ७ वर्षीय मुलगी, खामगावातील ६० वर्षीय महिला आणि शेगावातील ३५ वर्षीय सफाई कामगाराचा समावेश आहे. यातील दोघे कोणत्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले, हे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

बुलडाण्यात पुन्हा आढळले दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण

author img

By

Published : May 17, 2020, 10:32 AM IST

Updated : May 17, 2020, 12:58 PM IST

बुलडाणा - जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करीत असतानाच शनिवारी (१६ मे) पुन्हा खामगाव आणि शेगाव आणि आज (रविवार) मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे ३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २८ वर गेली आहे. त्यामधून २३ रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडले आहे. नव्या कोरोनाबाधितांमध्ये नरवेल येथील ७ वर्षीय मुलगी, खामगावातील ६० वर्षीय महिला आणि शेगावातील ३५ वर्षीय सफाई कामगाराचा समावेश आहे.

९ मे रोजी नरवेल येथील कुटुंबातील प्रमुखाचा कोरोनामुळे ठाणे येथे मृत्यू झाला होता. या कुटुंबातील ६ जण नरवेल येथे गावी परतले होते. यानंतर ग्रामस्थांनी त्यांना स्वाब चाचणी करून घेण्याविषयी आग्रह धरला होता. या सहा जणांचे खामगाव येथील रुग्णालयात स्वाब घेतले होते. यापैकी ४ जणांचे अहवाल शनिवारी निगेटिव्ह आले होते. तर, दोघांचे प्रतीक्षेत होते. या दोघांपैकी ७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या जिल्ह्यात पाच अ‌ॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

खामगाव येथील महिला आणि शेगाव येथील सफाई कामगार या दोघांना कोरोनाची लक्षणे आल्याने त्यांना शेगाव आणि खामगावच्या कोविड रुग्णालयात भरती करून त्यांचे स्वाबचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. याचे अहवाल आज शनिवारी संध्याकाळी आले असता त्यात या दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या तिघांच्या संपर्कात आलेल्यांची यादी तयार करण्यात येत आहे. मात्र, यातील खामगाव आणि शेगावातील दोघे रुग्ण कोणत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले, हे शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. कोरोनाबाधित आलेल्या रुग्णांच्या आजूबाजूचा खामगाव आणि शेगाव, नरवेल येथील परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Last Updated : May 17, 2020, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.