ETV Bharat / state

शेतकऱ्याकडून हजार रुपयाच्या लाचेची मागणी; अव्वल कारकुनाला एसीबीकडून रंगेहाथ अटक

अव्वल कारकुन कांतीलाल मांगीलाल जाधव (वय ५१) याने तक्रारदार शेतकऱ्याकडे एक हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा
जिल्हाधिकारी कार्यालय बुलडाणा
author img

By

Published : Dec 23, 2020, 10:28 PM IST

Updated : Dec 23, 2020, 10:59 PM IST

बुलडाणा- प्रकल्पबाधीत शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्रानुसार करून देण्यासाठी एक हजाराची लाच स्वीकारणारा जिल्हा पुर्नवसन
कार्यालयातील अव्वल कारकून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात संध्याकाळी करण्यात आली आहे. कांतीलाल जाधव असे अटकेतील कारकुनाचे नाव आहे.

खामगाव तालुक्यातील तक्रारदार शेतकऱ्याची शेती जीगाव प्रकल्पाच्या क्षेत्रात येत आहे. या शेतापैकी काही जमीन आर शेती जिगाव प्रकल्पासाठी राखीव आहे. खराब वगळता लागवड योग्य क्षेत्रातून काही शेती मुलाच्या नावावर बक्षीस पत्र करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्याने अव्वल कारकून जाधव याच्याकडे केली होती. परंतु ही परवानगी देण्यासाठी अव्वल कारकुन कांतीलाल मांगीलाल जाधव (वय ५१) याने तक्रारदार शेतकऱ्याकडे एक हजार रुपयाची मागणी केली. त्यानंतर शेतकऱ्याने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.

अव्वल कारकुनाला एसीबीकडून रंगेहाथ अटक

हेही वाचा-दस्त नोंदणीकरता पाच लाखांच्या लाचेची मागणी; दुय्यम निबंधक एसीबीच्या जाळ्यात

सापळा रचून कारकुनाला पकडले रंगेहाथ-

लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज बुधवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. यावेळी अव्वल कारकून कांतीलाल जाधव यांनी पंचासमक्ष तक्रारदार शेतकऱ्याकडून एक हजार रुपयाची लाच स्वीकारली. त्याचवेळी पाळतीवर असलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. एसीबीकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक रामकृष्ण मळघणे यांच्या नेतृत्वात विलास साखरे, मोहम्मद रिजवान, रविंद्र दळवी, सुनील राऊत, विजय मेहेत्रे व चालक रगड यांनी कारवाई झाल्याचे बुलडाणा एसीबीचे पोलीस उपअधीक्षक
रामकृष्ण मळघणे यांनी सांगितले.

हेही वाचा-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशी महिला अंमली पदार्थ तस्कराला अटक

Last Updated : Dec 23, 2020, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.