ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात अंदाजे 64 टक्के मतदान, 59 उमेदवारांचे भाग्य मतदानयंत्रात बंद - 64 percent voting in buldana

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायं 6 वोजपर्यंत मतदान झाले. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 64 टक्के मतदानाची नोंद झाली.

बुलडाणा जिल्ह्यात अंदाजे 64 टक्के मतदान
author img

By

Published : Oct 22, 2019, 8:54 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी सकाळी 7 ते सायं 6 वोजपर्यंत मतदान झाले. संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामीण भागासह शहरी भागातही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. तर जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे 64 टक्के मतदानाची नोंद झाली.

बुलडाणा जिल्ह्यात अंदाजे 64 टक्के मतदान

हेही वाचा - सांगलीत मतदानाचा टक्का घसरला; सरासरी केवळ 66 टक्के मतदानाची नोंद...

जिल्ह्यात 59 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामध्ये मलकापूर मतदारसंघात 11, बुलडाणा 7, चिखली 10, सिंदखेड राजा 10, मेहकर 5, खामगांव 12, जळगांव जामोद मतदारसंघात 4 उमेदवार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी प्रशासकीय इमारतमधील मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?

जिल्ह्यात एकूण मतदानासाठी 2263 मतदान केंद्रे होती. यामध्ये मलकापूर 300, बुलडाणा 335, चिखली 313, मेहकर 348, सिंदखेड राजा 336, खामगांव 316 आणि जळगांव जामोद येथे 315 मतदारकेंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारासंघामध्ये 10 टक्के मतदानकेंद्रांवर वेब कास्टींग देखील करण्यात आले. प्रत्येक विधानसभा निहाय मतदारक्षेत्रात प्रत्येकी 1 याप्रमाणे 7 सखी, 7 आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सर्व एकूण मतदार केंद्रांवर अंदाजे 64 टक्क्यांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक : यंदा मतदानाचा टक्का घसरला, अंदाजे ५६ टक्के मतदान

मलकापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 67, बुलडाणामध्ये 57, चिखलीमध्ये 65.05, सिंदखेड राजा 64.05, मेहकर 62.15, खामगांव 72.03 आणि जळगांव जामोदमध्ये 70 टक्के असे एकूण संभाव्य 64 टक्के मतदान झाले आहे. संबंधित आकडेवारी संभाव्य आहे. यामध्ये मतदान पथके परतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळणे अपेक्षित असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

चोख व्यवस्था व बंदोबस्त -

मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाकडून सर्व मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात बॅलेट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली होती. सर्व केंद्रांवर एकूण 11 हजार 315 अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पोलीस, महसूल प्रशासनाने चोख सेवा बजावली.

विधानसभा निहाय क्षेत्रात 24 ऑक्टोबरला मतमोजणी -

विधानसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतांची मोजणी 24 ऑक्टोबरला गुरूवारी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघांची मतमोजणी कृषिउत्पन्न बाजार समिती बेलाड फाटा, बुलडाणा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, चिखली विधानसभा क्षेत्रामध्ये तालुका क्रीडा संकुल, सिंदखेड राजा येथे जिल्हा मार्केटींग अधिकारी गोदाम सहकार विद्या मंदीराजवळ, मेहकर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम डोणगांव रोड, खामगांव येथे मातोश्री जयाबेन जिवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदीर आणि जळगाव जामोद येथे शासकीय धान्य गोदाम याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

Intro:Body:बुलडाणा :  जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज 21 ऑक्टोंबर 2019 रोजी सकाळी 7 ते सायं 6 वोजपर्यंतमतदान झाले. सर्वत्र उत्साहात व शांततेत मतदान प्रक्रिया संपूर्ण जिल्ह्यात पारपडली. ग्रामीण भागासह शहरी भागातही सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. अनेकमतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यात सातहीविधानसभा मतदारसंघात सायं 6 वाजेपर्यंत अंदाजे  64 टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. जिल्ह्यात59 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. त्यामध्ये मलकापूर मतदारसंघात11, बुलडाणा 7, चिखली 10, सिंदखेड राजा 10, मेहकर 5, खामगांव 12,  जळगांव जामोद  मतदारसंघात 4 उमेदवार आहेत.  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉनिरूपमा डांगे यांनी प्रशासकीय इमारतमधील मतदान केंद्रात आपल्या मतदानाचा हक्कबजाविला. तसेच मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.     जिल्ह्यात एकूण मतदानासाठी दोन हजार दोनशे 63मतदान केंद्रे होती. यामध्ये मलकापूर 300, बुलडाणा 335,  चिखली 313,  मेहकर 348, सिंदखेड राजा 336,  खामगांव 316 आणि जळगांव जामोद येथे 315 या मतदारकेंद्रांचा समावेश होता. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारासंघामध्ये 10 टक्के मतदानकेंद्रांवर वेब कास्टींग देखील करण्यात आले. प्रत्येक विधान सभानिहाय मतदारक्षेत्रात प्रत्येकी एक याप्रमाणे 7 सखी, 7 आदर्श मतदान केंद्रे उभारण्यात आलीहोती. या सर्व एकूण मतदार केंद्रांवर अंदाजे 64  टक्केवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  मलकापूर विधानसभामतदारसंघामध्ये अंदाजे 67, बुलडाणामध्ये 57, चिखलीमध्ये 65.05, सिंदखेड राजा64.05, मेहकर 62.15, खामगांव 72.03 आणि जळगांव जामोदमध्ये 70 टक्के असे एकूणअंदाजित संभाव्य 64 टक्के मतदान झाले आहे. संबंधित आकडेवारी अंदाजित संभाव्य असूनमतदान पथके परतल्यानंतर रात्री उशीरापर्यंत अंतिम आकडेवारी मिळणे अपेक्षितअसल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. चोख व्यवस्था व बंदोबस्तमतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी प्रशासनाकडून सर्व मतदानकेंद्रांवर पुरेशाप्रमाणात बॅलट, नियंत्रण युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्धकरून देण्यात आली होती. या सर्व केंद्रांवर एकूण 11 हजार 315 अधिकारी-कर्मचारीयांच्यासह पोलिस, महसूल प्रशासनाने चोख सेवा बजावली.            विधानसभानिहाय क्षेत्रात 24 रोजी मतमोजणी विधानसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतांची मोजणी 24 ऑक्टोबररोजी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. मलकापूर विधानसभा मतदार संघांची मतमोजणी कृषिउत्पन्न बाजार समिती बेलाड फाटा, बुलडाणा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, चिखली विधानसभा क्षेत्रामध्ये तालुका क्रीडा संकुल, सिंदखेड राजा  येथे जिल्हा मार्केटींग अधिकारी गोदाम सहकारविद्यामंदीराजवळ, मेहकर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम डोणगांव रोड,खामगांव येथे मातोश्री जयाबेन जिवनलाल मेहता सरस्वती विद्या मंदीर आणि जळगांवजामोद येथे शासकीय धान्य गोदाम याठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. 

-वसीम शेख,बुलडाणा-
--Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.