ETV Bharat / state

भंडाऱ्यात 148 ग्रामपंचायतींसाठी सुरू मतदान

author img

By

Published : Jan 15, 2021, 12:15 PM IST

भंडारा जिल्ह्याच्या 148 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे. 2745 उमेदवार रिंगणात असून दोन लाख 11 हजार 191 मतदार हे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 468 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत.

भंडाऱ्यात 148 ग्रामपंचायतींसाठी सुरू मतदान
भंडाऱ्यात 148 ग्रामपंचायतींसाठी सुरू मतदान

भंडारा - जिल्ह्याच्या 148 ग्रामपंचायतीसाठी मतदानाला सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे. 2745 उमेदवार रिंगणात असून दोन लाख 11 हजार 191 मतदार हे त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी 468 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत. तसेच मतदान सुरळीत व्हावे यासाठी 1151 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात केलेले आहे.

सकाळी साडेसातपासून मतदान सुरू
148 ग्रामपंचायतीचा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. अचानक थंडी वाढल्याने सकाळी मतदानासाठी गर्दी कमी असल्याचे दिसून आले. मात्र दिवसभरात चांगले मतदान होण्याची शक्यता आहे. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

2745 उमेदवार रिंगणात
148 ग्रामपंचायतीसाठी साकोली तालुक्यातील अठरा, मोहाडी तालुक्यातील 17, भंडारा तालुक्यातील 35, पवनी तालुक्यातील 27, लाखनी तालुक्यातील 20, साकोली 20 आणि लाखांदूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. 461 प्रभागातून 1263 सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी 2545 उमेदवार सध्या रिंगणात उभे आहेत. यामध्ये तुमसर तालुक्यात 160 जागांसाठी 386 उमेदवार, मोहाडी तालुक्यात 141 जागांसाठी 349 उमेदवार, भंडारा तालुक्यातील 305 जागांसाठी 685 उमेदवार, पवनी तालुक्यातील 215 जागांसाठी 448 उमेदवार, लाखनी तालुक्यातील 156 जागांसाठी 324 उमेदवार, साकोली तालुक्यातील 160 जागांसाठी 294 उमेदवार आणि लाखांदूर तालुक्यातील 90 जागांसाठी 223 उमेदवार रिंगणात उभे आहेत.

कुठलीही अनुचित घटना नाहीसकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या मतदानात सध्या तरी कुठलीही अनुचित घटना घडली नसल्याचे समोर आले आहे. ईव्हीएम मशीन सध्या व्यवस्थित सुरू असून कुठेही तणावाचे वातावरण निर्माण झालेले नसल्याने सध्यातरी मतदान शांततेत सुरू असल्याचे दिसून येत आहे. लाखांदूर तालुक्यातील इंदुरा, मुर्झा, पारडी, चीचगाव, कान्हाळगाव, पुयार ही गावे संवेदनशील गावे आहेत.

हेही वाचा - जामनेरात निवडणुकीच्या वादातून चाकू हल्ला; पिस्तुल रोखून धमकावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.