ETV Bharat / state

मतदाराने मतदान करतानाचा फोटो केला व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल - दाखल

एका मतदाराने भंडारा-गोंदियात झालेल्या मतदानातील मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

मतदाराने मतदान करतानाचा फोटो केला व्हायरल, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
author img

By

Published : Apr 17, 2019, 11:38 PM IST

भंडारा - मतदाराने केलेले मतदान गुप्त असावे, यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्नशील असते. मात्र, एका मतदाराने भंडारा-गोंदियात झालेल्या मतदानातील मतदान करतानाचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी संबधित प्रकरणाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाकडे याप्रकरणी तक्रार दिली आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलला मतदान पार पडले. येथील निवडणूक शांततेत पार पाडली. येथील सर्वांना २३ मे ला लागणाऱ्या निकालाची प्रतिक्षा आहे. मात्र, एका अतिउत्साही मतदाराने या ठिकाणी मतदान काढतानाचा फोटो व्हायरल केला आहे. त्यामुळे भविष्यात मतदान करताना मोबाईलवर बंदी येऊ शकते. या व्हायरल झालेल्या फोटोमुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे.

फोटो काढून व्हायरल करणारा मतदार हा तुमसर तालुक्यातील आहे. त्याने काढलेल्या या फोटोत त्याने कोणाला मतदान केले हे स्पष्टपणे दिसत आहे.

Intro:मतदान करतांना काढलेली फोटो व्हाट्सअँप वर पाठविली आहे.

Anc : मतदाराचा मतदान गुप्त असावा यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असतो पण या सर्व उपाययोजना हरताळ फासत भंडारा जिल्ह्यातील एका मतदाराने मतदान करतांनाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे त्यामुळे गोपनीयता भंग करणाऱ्या या मतदारावर निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Body:11 तारखेला भंडारा -गोंदिया च्या लोकसभेसाठी मतदान पार पडले. निवडणूक शांततेत पार पाडली आता 23 मी च्या निकालाची प्रतीक्षा मतदारांना आणि राजकीय मंडळींना आहे.
मात्र एका अतिउत्साही मतदाराने जे केले त्यामुळे भविष्यात मतदान करतांना मोबाईल वर बंदी येऊ शकते, कारण या महाशयाने मतदान करतांना कोणाला मतदान करीत आहे याची मोबाईल ने फोटो काढली इतकेच नाही तर काही दिवसांनी हा फोटो सोशल मीडियावर सुद्धा वायरल केला त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच फजिती झाली आहे, कारण भंडारा- गोंदिया जिल्हाधिकारी हे माध्यमांना नेहमी नियमनाचा हवाला देऊन निवडणूक प्रक्रिपासून सतत दूर ठेवण्याचे प्रयत्न केले आहे, एवढंच नाही तर मतदान करतांना माध्यमांनी फोटो किंवा विडिओ घेऊ नये अश्या पद्धतीने नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करू अशी त्यांची भाषा होती, मात्र माध्यमांना नियम शिकविणारे निवडणूक अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांना नियम आणि जवाबदारी शिकविण्यात अयशस्वी ठरलेत.
तुमसर तालुक्यातील हा मतदार असून त्याने काढलेल्या फोटोत त्यांनी कुणाला मतदान दिले हे स्पष्टपणे दिसत आहे मात्र नियम भंग करणार हा व्यक्ती निवडणूक अधिकाऱयांना का दिसला नाही असा प्रश्न निर्माण होतो.
एका अतिउत्साही तरुणाने केलेल्या चुकीची शिक्षा समोर सर्व मतदारांना होऊ शकते कारण मतदान करतांना प्रत्येकाच्या खिश्यात मोबाईल हा असतोच पण त्याचा जर असा दुरुपयोग झाल्यास भविष्यात मतदान करतांना मोबाईल ठेवण्यास बंदी येऊ शतके.
फोटो व्हायरल झाल्यावर जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी संबधित प्रकरणाची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाकडे या प्रकरणाची तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे आता काय कार्यवाही केली जाते या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.