ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील शाळा बंदच; शिक्षक कोरोना चाचण्यांच्या प्रतिक्षेत

भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या आणि दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्या यांचे गणित केल्यास सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होणार याचे उत्तर कोणाकडेच नाही.

author img

By

Published : Nov 23, 2020, 6:18 PM IST

Updated : Nov 23, 2020, 8:45 PM IST

school
शाळा

भंडारा - कोरोना चाचण्या झाल्या नसल्याने भंडारा जिल्ह्यातील शाळा 23 तारखेला सुरू झाल्या नाहीत. तसेच या शाळा भविष्यात कधी सुरू होतील याविषयी कोणीही अधिकारी ठामपणे सांगू शकत नाही. जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या आणि दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्या यांचे गणित केल्यास सर्व शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण होण्यास 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे या शाळा सुरू होतील की नाही? असा प्रश्न आता पालकांना, विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पडला आहे.

प्रतिनिधी दिपेंद्र गोस्वामी यांनी घेतलेला आढावा

23 तारखेला शाळा सुरू झाल्याच नाही -

23 तारखेपासून शाळा सुरू करायच्या असे आदेश शिक्षणमंत्र्यांनी दिले होते. मात्र, शाळा सुरू होण्याअगोदर शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करणे हे अनिवार्य होते आणि नेमका इथेच घोळ झाला. 23 तारीख गेली तरीही भंडारा जिल्ह्यातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्या झाल्याच नाहीत. ज्यांच्या चाचण्या झाल्या त्यांचा अहवालसुद्धा प्राप्त झाला नाही. त्यामुळे 23 तारखेला सुरू होणाऱ्या सर्वच शासकीय, निमशासकीय, खासगी, जिल्हा परिषदेच्या शाळा किंवा नगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्याच नाहीत. सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येऊ नका असे सांगण्यात आले आहे. शाळेने त्यांची तयारी पूर्ण केली होती. मात्र, प्रशासन त्यांच्या तयारीत कमी पडल्यामुळे आज शाळा सुरू होऊ शकणार नाहीत.

6 हजार शिक्षकांपैकी केवळ 900 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या पूर्ण -

प्रत्येक शिक्षकांची आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे शिक्षण विभागाने अनिवार्य केले आहे. तसे पत्रही आरोग्य विभागाला दिले. मात्र, आरोग्य विभागाची एकूण क्षमता किती याचा शिक्षण विभागाने विचार केला नाही. नियमित कोरोना रुग्णांची टेस्ट आणि त्यात शिक्षकांची टेस्ट करणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस करणे आरोग्य विभागाला शक्य होत नाही. भंडारा जिल्ह्यात एकूण 6 हजार 124 शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी आहेत. त्यापैकी 900 लोकांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सोमवारपर्यंत यापैकी एकाही शिक्षकांचा कोरोना अहवाला प्राप्त झाला नव्हता.

दररोज केवळ 135 लोकांच्या चाचण्या होणार -

आरोग्य विभागाच्या नऊ केंद्रावरून कोरोना चाचण्या होणार आहेत. मात्र, रोज एका केंद्रावर फक्त 15 नमुने घेतले जाणार आहेत. तसे पत्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना आणि यंत्रणांना दिले आहे. आरोग्य विभागाच्या पत्रानुसार दररोज 135 शिक्षकांचे किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे घशाचे नमुने घेतले जाणार आहेत. म्हणजेच भंडारा जिल्ह्याच्या शिक्षकांची संख्या लक्षात घेता आणि ज्या संथगतीने या सर्व चाचण्या सुरू आहेत त्याला जवळपास 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे. भंडारामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांचे नमुने घेतले जातात. मात्र, त्याचा अहवाल हा नागपूरवरून येतो आणि त्यामुळे एका अहवालासाठी कमीतकमी तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे.

पालकांची अनुमती केवळ 10 टक्केच

शिक्षणाधिकारी यांनी शाळा सुरु करायच्या जरी ठरवले असले तरी केवळ दहा टक्के पालकच स्वतःच्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेतील केवळ दहा टक्के पालकांनी अनुमती पत्र दिले आहे. ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी अनुमती दिली होती त्यापैकी काही विद्यार्थी आज शाळेत मोठ्या उत्साहाने आले होते. मात्र, शाळा सुरु होणार नाही हे लक्षात आल्यावर निराश होऊन विद्यार्थी घरी परतले.

शिक्षकांच्या टेस्ट पूर्ण झाल्याशिवाय शाळा सुरू होणार नाही

जोपर्यंत शिक्षकांची व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही, अशी भूमिका मुख्याध्यापकांनी घेतली आहे. आमचे शिक्षक दररोज दिलेल्या वेळेवर चाचण्या करण्यासाठी जातात. मात्र, मागील तीन दिवसांपासून त्यांच्या चाचण्या होत नाहीत. उलट सोमवारी किट नसल्याचे सांगून शिक्षकांना परत पाठवले गेले. ज्या शिक्षकांच्या टेस्ट झाल्या त्यांच्या मागील चार दिवसांपासून अहवाल मिळालाच नाही. त्यामुळे जोपर्यंत चाचण्या नाही तोपर्यंत शाळा सुरू नाही, अशीच आमची भूमिका असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

हेही वाचा - शरद पवार म्हणजे चार खासदारांचे लोकनेते; आमदार गोपीचंद पडळकरांचा निशाणा

हेही वाचा - कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष यांना जामीन मंजूर!

Last Updated : Nov 23, 2020, 8:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.