भंडारा - उपविभागीय अधिकाऱ्यावर पवनी येथे वाळू तस्करामार्फत जीवघेणा हल्ला ( Sand Mafia Attack On Officer ) झाला आहे. पहाटेच्या 3.30 वाजताचे दरम्यान वाळू तस्करीला आळा घालण्याचे हेतूने उपविभागीय अधिकारी यांचे पथकाकडून वाळूने भरलेल्या टिप्परवर होत असलेली कार्यवाही पाहून जवळपास 25-30 वाळू तस्करांनी हातात लाठ्या, दगड व फावळे घेऊन भरारी पथकाच्या गाडीच्या काचा फोडून अधिकाऱ्यांना मारहाण ( Sand mafia attack on Bhandara sub-divisional officer ) केली. यात उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड जखमी झाले आहेत. त्याच्या तक्रारी वरून पवनी पोलिसात 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकाऱ्याला मारहाण करुन ट्रक पळवळे- भंडारा जिल्हा वाळू तस्करीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यातच पवनी तालुक्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी तुन वाळू तस्करी चे प्रमाण सर्वाधिक आहे अवैध वाळू उपसा करून तस्करी करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी भंडारा अवनी चे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे 27 तारखेच्या पहाटे 3.30 वाजेला पवनी येथे पोहोचले. पवनी तालुक्यातील बेटाळा गावालगत उपविभागीय अधिकारी यांचे पथकाने अवैध वाळू तस्करी करीत असलेल्या 3 टिप्परला थांबवून कार्यवाही सुरू केली. यावेळेस पवनी पोलीसांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले. तोपर्यंत तरच चालकाने त्याच्या मालकासह पितळी बोलतच करणार तिथे बोलवून घेतले. घटनास्थळी प्रत्यक्ष पोलीस हजर असतांना 25-30 वाळू तस्करांनी टोळी आली. आणि हातात असलेल्या लाठ्यानी, दगडांनी तसेच फावळ्यानी त्यांच्या खाजगी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्यानंतर उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांना मारहाण करायला सुरुवात केली. तसेच पकडलेले तिन्ही ट्रक घटना स्थळावरून पसार केले.
पवनी पोलीस स्टेशन ला दिली तक्रार - पहाटेच्या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांनी बऱ्याच कालावधीनंतर पवनी पोलिस स्टेशन येथे या वाळू तस्करांविरुद्ध तक्रार दाखल केली. राठोड यांनी दिलेल्या माहितीवरून पंचवीस लोकांवर 114/22 कलम 353, 332, 379, 506, 427, 109 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ लोकांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.