भंडारा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत नसले तरी बजेट अधिवेशन नागपुरात होईल. त्यामुळे विदर्भाच्या लोकांवर अन्याय झाला नसून बजेट अधिवेशनामुळे विदर्भाला अधिक न्याय मिळेल. इतिहासात पहिल्यांदाच बजेट अधिवेशन नागपुरात होणार आहे. ही बाब विदर्भासाठी आनंदाची असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
वर्षातून एक तरी अधिवेशन नागपूरला व्हावे असे ठरले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन रद्द झाले असले तरी बजेट अधिवेशन नागपुरला घ्यावे, अशी मागणी विदर्भातील नेते मंडळींनी केली होती. त्याला सत्ता आणि विरोधी पक्षातील लोकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच विदर्भामध्ये बजेट अधिवेशन होणार आहे. अधिवेशनामुळे विदर्भाला जास्त न्याय मिळू शकतो. त्यामुळे हिवाळी अधिवेशन विदर्भात झाले नाही. त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - प्रवाशांना दिलासा! दिवाळी निमित्त भंडारा आणि गोंदिया आगारातून 44 जादा बस सोडण्यात येणार
हेही वाचा - भंडारा : प्रशासकीय अधिकारी अन् पोलीस पथकासह आमदारांची वाळू साठ्यावर कारवाई