भंडारा - जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना हा हळू-हळू पाय पसरत आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील मंदिरांमध्ये भक्तगण कोरोनाच्या नियमांचे पालन करतात की नाही, याची सत्यता ईटीव्ही भारताचे तपासली. तेव्हा भंडाऱ्यामध्ये भक्तगण हे मंदिरात जाताना किंवा मंदिरात पूजा अर्चना करताना कोरोनाच्या नियमांचे पालन करतात, असे निर्दशनास आले आहे. सर्वच भक्त हे करत नसले तरी बहुतांश भक्त कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत.
मागच्या वर्षी कोरोना कालावधीमध्ये गर्दीचे ठिकाण असलेल्या मंदिर, मशिदी, गुरुद्वारे या धार्मिक स्थळांना बंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर धार्मिक स्थळे शासनाने सुरू केली. मात्र कोरोना पुन्हा डोके वर काढू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोना संदर्भात असलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री द्वारे करण्यात आले होते. भक्तगण खरेच मंदिरांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करतात का, याची सत्यता तपासून पाहण्यासाठी ईटीव्ही भारत मंदिरात प्रवेश केला असता मंदिराच्या बाहेर कोरोनाशी लढा देण्याचे फलक लागले होते. भक्तांनी मास्क घालावे, सोशल डिस्टन्सिंग ठेवावा हे लिहिलेले होते. मंदिराच्या आत बहुतांशी भक्त स्वतःच्या तोंडावर मास्क घालून होते. तर, गर्दीचे ठिकाण असले तरी शक्य तेवढे अंतर ठेवून उभे राहून पूजा करतानी आणि आरती म्हणताना दिसले. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात तरी मंदिरात या नियमांचे पालन होत असल्याचे सध्या दिसत आहे.
कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी दुप्पट झाली
जानेवारी महिन्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या एकेरी आकड्यावर आली होती. एक दिवस तर ही संख्या तीनवर आली होती. त्यामुळे भंडारा कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा असतानाच महाराष्ट्रात विशेष करून विदर्भात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहे. यात आता भंडारा पुढे येत आहे. गुरुवारी भंडाऱ्यामध्ये 20 जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. शुक्रवारी ही संख्या वाढून दुप्पट होऊन 44 वर गेली आहे. त्यामुळे सर्वत्र खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी गर्दीचे ठिकाण टाळून, सोशल डिस्टन्सिंग ठेवून, हात स्वच्छ धुवावे, मास्क वापरावे, असे आव्हान जिल्हाधिकारी यांच्यातर्फे करण्यात आलेले आहेत.
शनिवार-रविवार पर्यटन क्षेत्रावर बंदी
भंडारा जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्र असलेले रावणवाडी हे शनिवार-रविवारी पर्यटकांसाठी बंद असणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी संदीप जाधव यांनी काढले आहे. याठिकाणी जिल्ह्याबाहेरील लोक येत असल्यामुळे पर्यटन ठिकाण सध्या शनिवार रविवार बंद ठेवण्यात येणार आहे.