ETV Bharat / state

भंडाऱ्यातील 'त्या' अपघातानंतर काळी पिवळी बंद करण्याची मागणी तीव्र

साकोली तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी ही प्रवासी गाडी खाली कोसळली होती. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. या गाडीमध्ये एकूण पंधरा लोक प्रवास करीत होते. अशा गाड्यांची क्षमता ही सात अधिक एक एवढी असते. मात्र, प्रत्येक वेळी या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते.

यांसारख्या काळीपिवळी गाडी बंद करण्याची मागणी होत आहे.
author img

By

Published : Jun 21, 2019, 11:13 PM IST

भंडारा - प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी-पिवळी गाडीचा मंगळवारी झालेल्या अपघातात 5 विद्यार्थिनींसह एका महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी गाड्या बंद करण्याची मागणी होत आहे. या अगोदरही एका काळी पिवळी प्रवासी गाडीच्या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2 महिने या गाड्या बंद राहिल्या. आता पुन्हा या गाड्या बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, अपघात थांबविण्यासाठी या गाड्या बंद करणे या एकमेव पर्याय आहे, का असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

भंडाऱयातील 'त्या' अपघातानंतर काळी पिवळी बंद करण्याची तीव्र मागणी

साकोली तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी ही प्रवासी गाडी खाली कोसळली होती. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला होता. या गाडीमध्ये एकूण पंधरा लोक प्रवास करीत होते. अशा गाड्यांची क्षमता ही सात अधिक एक एवढी असते. मात्र, प्रत्येक वेळी या गाडीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने वाजवीपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसल्यामुळे बरेचदा चालक हा त्याच्या जागेवर न बसता गाडीच्या दाराजवळ खेटून बसतो. त्यामुळे अडचणीच्या वेळेस या चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने मोठे मोठे अपघात होत असतात.

people demands banned on these vehicles.
यांसारख्या काळीपिवळी गाडी बंद करण्याची मागणी होत आहे.

या अपघातानंतर, पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाईचे प्रमाण वाढविले आहे. त्यामुळे अपघातानंतर काळीपिवळी ही गाडी जिल्ह्यात धावताना दिसत नाही. उर्वरित प्रवासी गाड्या या त्यांच्या क्षमतेनुसार प्रवासी वाहून नेत असल्याचे चित्र दिसत आहे. या गाड्यांमध्ये बसण्या अगोदर त्याची क्षमता किती याची दक्षता घेऊनच प्रवाशांनी प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केले आहे.

येणाऱ्या काळात प्रवाशांच्या दृष्टीने जनजागृती करून त्यांचा प्रवास सुखरूप कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या गाड्या पूर्णपणे बंद करणे हे सध्यातरी शक्य नाही कारण प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय अशा पद्धतीने गाड्या बंद केल्यास त्याचा फटका प्रवाशांना बसेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Intro:ANC : मंगळवारी प्रवासी काळी पिवळी गाडीच्या अपघातात 5 विद्यार्थिनीसह एका महिलेचा मृत्यू झाला होतो, या अपघातानंतर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध प्रवासी गाड्या बंद करण्याची मागणी होत आहे, या अगोदरही एका काळी पिवळी प्रवासी गाडीच्या अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला होता त्यानंतर 2 महिने या गाड्या बंद राहिल्या. आता पुन्हा या गाड्या बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, मात्र अपघात थांबविण्यासाठी या गाड्या बंद करणे या एकमेव पर्याय आहे का असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.

Body:साकोली तालुक्यातील चुलबंद नदीच्या पुलावरून काळीपिवळी ही प्रवासी गाडी खाली कोसळून झालेल्या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला होता या गाडीमध्ये एकूण पंधरा लोक प्रवास करीत होते अशा गाड्यांची क्षमता ही सात अधिक एक एवढी असते मात्र प्रत्येक वेळेस काळी पिवळी मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जाते. अशा पद्धतीने वाजवीपेक्षा जास्त प्रवासी गाडीत बसल्यामुळे बरेचदा चालका त्याच्या जागेवर न बसता गाडीच्या दाराजवळ खेटून बसतो तेव्हा सर्वसामान्यांना एकच प्रश्न असतो की हा गाडी चालवतो तरी कसा त्यामुळेच अडचणीच्या वेळेस या चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता येत नसल्याने मोठे मोठे अपघात होताना आपण नेहमीच पाहतो.
या प्रवासी गाड्यां ज्यामध्ये ऑटो मॅजिक कार काळी पिवळी या प्रत्येक गाडीमध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी वाहतूक केले जातात हे कायद्याने चुकीचा आहे याची जाणीव त्या चालकाला, तिथे बसणाऱ्या प्रवाशाला, नागरिकांना, राजकीय लोकांना आणि पोलिस अधिकाऱ्यांना सर्वांनाच असते मात्र अशोक प्रकार कधीही थांबत नाही उलट एखादा अपघात झाल्यास लगेच अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या मागण्या वाढू लागतात.

या अपघातानंतर पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कारवाईचे प्रमाण वाढविले आहे त्यामुळे अपघातानंतर काळीपिवळी ही गाडी जिल्ह्यात धावताना दिसत नाही उर्वरित प्रवासी गाड्या या त्यांच्या क्षमतेनुसार प्रवासी वाहून नेत असल्याचे चित्र आहे या गाड्यांमध्ये बसण्या अगोदर त्याची क्षमता किती याची दक्षता घेऊनच प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन जिल्हा पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी केलेला आहे येणाऱ्या काळात प्रवाशांच्या दृष्टीने जनजागृती करून त्यांचा प्रवास सुखरूप कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले मात्र या गाड्या पूर्णपणे बंद करणे हे सध्यातरी शक्य नाही कारण प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय अशा पद्धतीने गाड्या बंद केल्यास त्याचा फटका प्रवाशांना बसेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

याअगोदरही या अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर पोलिस प्रशासनाने कारवाया केल्या मात्र बरेचदा त्यांना राजकीय हस्तक्षेपाचा ही फटका बसला आता अपघातानंतर हेच राजकीय लोक अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याच्या मागण्या करतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सोपा आणि सरळ मार्ग म्हणजे नागरिकांनीच क्षमते पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या गाड्यांवर बसू नये. पण नागरिकांना हे शक्य होईल का हा खरा प्रश्न आहे.
बाईट : रश्मी नांदेडकर, पोलीस उपअधीक्षक, भंडारा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.