ETV Bharat / state

पालकमंत्री परिणय फुकेंकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी, मदतीचे दिले आश्वासन

परतीच्या पावसाने धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शनिवारी पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मुंढे यांनी लाखणी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतीच्या दौऱ्याबाबत माहिती देताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके
author img

By

Published : Nov 3, 2019, 4:36 PM IST

भंडारा - परतीच्या पावसाने धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शनिवारी पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मुंढे यांनी लाखणी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली. फुके यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी करून जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांची बैठक घेतली व त्यांना तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतीचे आणि शेतकऱ्यांचे आकडे देण्याचे आदेश दिले.

नुकसानग्रस्त शेतीच्या दौऱ्याबाबत माहिती देताना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके

परतीच्या पावसासुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान पाहता महाराष्ट्र शासनाने १० हजार कोटींची घोषणा केली आहे. येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, असे परिणय फुके यांनी पाहणी दरम्यान सांगितले. परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील विविध भागातील शेत पिकांचे मोठे नुकसान केले आहे. भंडारा जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी हलका धान कापनीला आला असतानाच अचानक परतीच्या पावसाने वादळवऱ्यासह हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले.

८ महिने अथक प्रयत्न करून विविध संकटांचा सामना करून शेतकऱ्यांनी जे पीक उभे केले होते ते पूर्णपणे भुईसपाट झाले. इतकेच नव्हे तर, जे धान कापून शेतात ठेवले होते, ते देखील पाण्यात भिजले. त्यामुळे त्यांना कोंब फुटली, तर काही धान पूर्णपणे खराब झाले. या शेतकऱ्यांना आता सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी तीन दिवसाआधी साकोलीचे नवनिर्वाचित आमदार नाना पटोले याना देखील सरसकट १५००० रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती.

फुके यांनी धानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी केली चर्चा

परतीच्या पावसाने लाखनी, साकोली आणि लाखांदूर या क्षेत्राचे सर्वात ज्यास्त नुकसान केले आहे. त्यामुळे फुके यानी तिन्ही तालुक्याची पाहणी केली. त्यांच्यासह खासदार सुनील मेंढे, माजी आमदार बाळा काशिवार, तसेच उपविभागीय अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी होते.

हेही वाचा- परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी - नाना पटोले

परिणय फुके यांनी धानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि याविषयी एक आढावा बैठक घेत पुढच्या तीन ते चार दिवसात सर्व्हे पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर, त्यांनी येत्या १० दिवसात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याचे देखील सांगितले. पाहणी दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची घोषणा केली आहे. आणि त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- लाखांदूर तालुक्यात परतीच्या पावसाचा धान पिकांना फटका

Intro:ANC : परतीच्या पावसाने धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शनिवारी पालकमंत्री परिणय फुके आणि खासदार सुनील मुंढे यांनी लाखणी, लाखांदूर आणि साकोली तालुक्यातील नुकसान ग्रस्त भातशेतीचे अधिकाऱ्यांसह पाहणी करून जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांची बैठक घेत त्यांना तातडीने सर्वे करून नुकसानग्रस्त शेतीचे आणि शेतकऱ्यांचे आकडे देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून महाराष्ट्र शासनाने 10 हजार कोटींची घोषणा केली असून येत्या दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे त्यांनी या पाहणी दरम्यान सांगितले.

Body:महाराष्ट्रत या पावसाने शेतीतील विविध पिकांचे मोठे नुकसान केले आहे. भंडारा जिल्हा धान शेतीचा जिल्हा आहे आणि ऑक्टोबर महिन्यांच्या शेवटी हलका धान कंपनीला आला असतांनाच अचानक परतीचा पाऊस वादळवऱ्यासह मुसळधार बरसला आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले, 8 महिने अथक प्रयत्न करून विविध संकटांचा सामना करून जे पीक उभे केले होते त्यापैकी उभे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आणि जे धान कापून शेतात ठेवले गेले होते ते पाण्यात भिजले त्यामुळे त्यांना कोंब फुटली तर काही धान पूर्ण खराब झाले या शेतकऱ्यांना आता अपेक्षा आहे ती सरकार कडून नुकसान भरपाई मिळावी. तीन दिवसा पहिले साकोली चे नवनिर्वाचित आमदार नाना पटोले याना शेतकऱ्यांना सरसकट 15000 रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती.
तर भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री परिणय फुके यांनी शनिवारी या नुकसग्रस्त शेतीचा निरीक्षण दौरा केला, या परतीच्या पावसाने सर्वात ज्यास्त नुकसान लाखनी, साकोली आणि लाखांदूर क्षेत्रात केले आहे त्यामुळेन्य तिन्ही तालुक्याची पाहणी त्यांनी केली त्यांच्यासह खासदार सुनील मेंढे, माजी आमदार बाळा काशिवार तसेच उपविभागीय अधिकारी आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी होते, धानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि या विषयी एक आढावा बैठक घेत पुढच्या तीन ते चार दिवसात सर्व्हे पूर्ण करण्याचे आदेश दिले आणि येत्या 10 दिवसात या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल असे त्यांनी सांगितले, पाहणी दरम्यान मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींची घोषणा केली आहे आणि त्याचा फायदा भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बाईट : टिकेश देशमुख, शेतकरी
परिणय फुके, पालकमंत्री, भंडारा

मात्र राजकीय लोक सत्तास्थापणेसाठी रस्सीखेच करण्यात व्यस्त होते, मात्र

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.