ETV Bharat / state

सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; भंडाऱ्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची लावली गैरहजेरी - government empolyees came late office bhandara

सोमवारपासून पाच दिवसांचा शासकीय कार्यालयीन आठवडा सुरू झालेला आहे. सोमवारपासूनच कार्यालयीन वेळ ही सकाळी 9 वाजून 45 मिनिटांची झालेली आहे. ही वेळ गाठण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवेश दारासमोर उभे होते. त्यांनी उशिरा येणाऱ्या लोकांची नोंद घेतली. तर स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवेशद्वारासमोर उभे असलेले पाहून शासकीय कर्मचाऱ्यांची एकच पळापळ सुरू झाली.

भंडारा जिल्हा परिषद
भंडारा जिल्हा परिषद
author img

By

Published : Mar 4, 2020, 1:25 AM IST

भंडारा - महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भंडारा येथे नवीन शासकीय वेळ ज्या कर्मचाऱ्यांना पाळता येत नाही अशा 25 लेट लतीफ कर्मचाऱ्यांची गैरहजेरी लावण्यात आली. हे सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे 9 वाजून 40 मिनिटांनी स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे हे जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रवेशद्वारा समोर हजर होते. यावेळी त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

भंडाऱ्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची लावली गैरहजेरी

सोमवारपासून पाच दिवसांचा शासकीय कार्यालयीन आठवडा सुरू झालेला आहे. सोमवारपासूनच कार्यालयीन वेळ ही सकाळी 9 वाजून 45 मिनिटांची झालेली आहे. ही वेळ गाठण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजून 40 मिनिटांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी प्रवेश दारासमोर उभे होते. त्यांनी उशिरा येणाऱ्या लोकांची नोंद घेतली. तर स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवेशद्वारासमोर उभे असलेले पाहून शासकीय कर्मचाऱ्यांची एकच पळापळ सुरू झाली. बरीच लोक अगदी शेवटच्या मिनिटांवर आले. त्यांनी धाव घेत हजेरी रजिस्टर गाठले.

हेही वाचा - ''हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता''...तारक मेहता विरुद्ध मनसे आक्रमक

ज्यावेळी सर्व सामान्य लोकांच्या घड्याळात 9 वाजून 45 मिनिटे वाजले होते, त्यावेळी जिल्हा परिषदमधील घड्याळात 9 वाजून 40 मिनिटे वाजले होते. त्यामुळे याचा ही फायदा या कर्मचाऱ्यांना मिळत असावा किंवा तो फायदा मिळवून घेण्यासाठी ही घड्याळ मुद्दाम पाच मिनिटे मागे ठेवली असावी, अशी चर्चा होत आहे.

यानंतर 9 वाजून 45 मिनिटे होताच जिल्हाध्यक्षांनी सर्व विभागातील हजेरी रजिस्टर आपल्या कक्षात आणण्याचे आदेश दिले. यानंतर आलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. या सर्व कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा कापण्यात आली आहे. तसेच या सर्वांना उशिरा येण्यासाठी नोटीसही बजावण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेल्या ठराविक वेळेवर उपस्थित रहावे, यासाठी आजची ही कार्यवाही करण्यात आली आहे. तर उद्यापासून इमारतीचे इतर सर्व दार बंद करून केवळ एकाच दारातून प्रवेश मिळणार आहे. वेळेचे बंधन न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.