ETV Bharat / state

भंडारा शहरात पार पडला गणपतीचा आगळावेगळा लग्नसोहळा

भंडारा शहरातील श्री सिद्ध चिंतामणी मंदिरात मागील ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जात आहे. यानुसार पहिल्या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सीमांत पूजेचे आयोजन केले गेले तर, तिसऱ्या दिवशी गुरुवारी गणपती आणि सिद्धी-बुद्धीचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात या पार पडला.

गणपती बाप्पांचा लग्नसोहळा
गणपती बाप्पांचा लग्नसोहळा
author img

By

Published : Jan 31, 2020, 1:19 PM IST

भंडारा - शहरात गुरुवारी 'गणपती आणि 'सिद्धी-बुद्धी' यांचा लग्नसोहळा पहिल्यांदाच विदर्भात पार पडला. खरतर असे म्हटले जाते की देव स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो पण, भंडाराकरांनी चक्क देवांचेच लग्न लावले आहे. या अनोख्या लग्न सोहळ्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.

गणपती बाप्पांचा लग्नसोहळा
गणपती बाप्पांचा लग्नसोहळा

भंडारा शहरातील श्री सिद्ध चिंतामणी मंदिरात मागील ३ दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जात आहे. यानुसार पहिल्या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सीमांत पूजेचे आयोजन केले गेले तर, तिसऱ्या दिवशी गुरुवारी गणपती आणि सिद्धी-बुद्धीच्या लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

भंडाऱ्यात गणपती बाप्पा आणि 'सिद्धी-बुद्धी' यांचा लग्नसोहळा

शहरातली काकडे निखाडे दांपत्याने सिद्धी-बुद्धीचे तर, रामेकर दांपत्याने गणपती बाप्पाचे कंकण धरले होते. या दोन्ही घरी मांडव घालण्यात आला होता. २९ रोजी वधू-वराच्या घरी हळदीचा सोहळा पार पडला. परमेश्वराचा सीमांत पूजनाचा विधी सर्वांसाठी एक आगळीवेगळी पर्वणी होती. यानंतर ३० जानेवारीला सकाळी बहिरंगश्वर मंदिर परिसरातून चिंतामणी मंदिराच्या दिशेने वरात निघाली. घोडे, मंगलवाद्य आणि बँड आणि वरात नाचत-गात मांडवात पोहोचली आणि बाप्पांची मंगलाष्टकांसही लग्नगाठ बांधली गेली, यावेळी उपस्थितांनी फुलांची उधळून केली.

हेही वाचा - बंदी असलेल्या थायलंड मागूर उत्पादकांवर भंडाऱ्यात कारवाई

यासोबतच, बाप्पांच्या लग्नासाठी ३३ कोटी देवांची उपस्थिती आवश्यक होती. त्यामुळे अनेकजण ३३ कोटी देवांच्या वेषभूषेत लग्नाला उपस्थित होते. यानंतर ब्रह्मपूजेचे आयोजन केले. दिवसभराचे लग्नसंस्कार उरकल्यानंतर बाप्पा सिद्धी-बुद्धीला घेऊन नगरभ्रमण करत घराच्या दिशेने निघाले. दरवर्षी सिद्ध चिंतामणी मंदिरात प्रतिष्ठापनेच्या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी भंडाराकरांना काही नवीन अनुभव घेता येईल या दृष्टीने गणपतीच्या लग्नाची ही संकल्पना पुढे आल्याचे आयोजकांनी सांगितले.

हेही वाचा - भंडाऱ्यातील सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची कार्यालयांकडे पाठ; कार्यालये दिसतात रिकामी

Intro:ANC : भंडारा शहरात गुरुवारी एक आगळेवेगळे लग्न सोहळा पार पडला. हा लग्न होता देवाचा 'गणपती आणि सिद्धी बुद्धी' यांचा लग्नाचा सोहळा पहिल्यांदाच विदर्भात पार पडला. खरतर असे म्हटले जाते की देव स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधतो पण भांडारकरांनी तर चक्क देवाचीच लग्न काय पृथ्वीवर बांधली आहे या अनोख्या लग्न सोहळ्याच्यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली होती.

Body:भंडारा शहरातील श्री सिद्ध चिंतामणी मंदिरात मागील तीन दिवसांपासून या लग्न सोहळ्याचे सर्व सोपस्कार पार पाडले जातात पहिल्या दिवशी गणपतीचे जन्मोत्सव साजरे करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी सीमांत पूजेचे आयोजन केले गेले आणि तिसऱ्या दिवशी गुरुवारी गणपती आणि सिद्धी बुद्धीच्या लग्नाचा सोहळा मोठ्या थाटामाटात या मंदिरात पार पडला.

काकडे निखाडे दांपत्याने सिद्धी बुद्धीचे तर रामेकर दांपत्याने गणपती बाप्पाचे कंकण धरले होते दोन्ही घरी मांडव पडला 29 रोजी वधूच्या वराच्या घरी हळदीचा सोपस्कार पार पडला संध्याकाळ झाली आणि सीमांत पूजनाला सुरुवात झाली साक्षात परमेश्वराचा सीमांत पूजनाचा सोहळा एक आगळीवेगळी पर्वणी सर्वांसाठी होती 30 जानेवारी ची सकाळ उजाडली बहिरंगश्वर मंदिर परिसरातून चिंतामणी मंदिराच्या दिशेने वरात निघाली घोडे मंगल वाद्य आणि बँड असा खराखुरा लग्नाला लाजवेल अशी वरात नाचत-गात मांडवात पोहोचली प्रत्यक्ष बाप्पांच्या साक्षीत बाप्पा चे मंगलाष्टकां लग्नगाठ बांधली गेली उपस्थितांनी पुष्पगुच्छ उधळून बापाच्या लग्नाचा हा सोहळा पार पडला बापाचं लग्न म्हटलं तर त्यात तीस कोटी देवांचे उपस्थिती आवश्यक होती त्यामुळे सर्व 33कोटी देव लग्नाला उपस्थित होते. यानंतर ब्रह्म पूजा चे आयोजन केले गेले
दिवसभराच्या लग्न सोहळ्याचे सुपस्टार उरकल्यानंतर बाप्पा सिद्धी बुद्धी ला घेऊन नगर भ्रमण करित घराच्या दिशेने निघाले बापाला नमन करत प्रत्येक भक्ताने त्याचे संकट हरण्याची यावेळेस विनंती केली. रात्री गणपतीची महापूजा आणि तेजोमय आरती केली जाईल आणि त्यानंतर गणपती शयनकक्षात जातील अशीच सर्व कल्पना घेऊन हा लग्नसोहळा पार पाडला गेला.
दरवर्षी सिद्ध चिंतामणी मंदिरात प्रतिष्ठापनेचा दिवसावर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यावर्षी भंडारे करांना काही नवीन अनुभव घेता येईल या दृष्टीने गणपती च्या लग्नाची ही संकल्पना पुढे आली असे आयोजकांनी सांगितले.
बाईट : दामोदर तरारे, अध्यक्ष, चिंतामणी मंदिर
माधव रामेकर, आयोजक भक्त

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.