ETV Bharat / state

Bhandara Z.P. President : भाजपाच्या मदतीने काँग्रेसने मिळवले जिल्हा परिषद अध्यक्षपद; उपाध्यक्षपद भाजपाकडे

author img

By

Published : May 10, 2022, 8:15 PM IST

Updated : May 10, 2022, 8:31 PM IST

भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या होत्या. अखेर आज ( मंगळवारी ) नवा अध्यक्ष जिल्हा परिषदेला मिळाला आहे. काँग्रेसने भाजपाच्या एका गटाची युती ( BJP Congress alliance Bhandara ZP ) केली असून अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे ( Gangadhar Jibhakate Congress for post ZP President ), पंकज राहागडाले तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदीप ताले यांची निवड झाली आहे.

Bhandara Z.P. President
Bhandara Z.P. President

भंडारा - अखेर भंडारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरला आहे. काँग्रेसने भाजपाच्या एका गटाशी युती ( BJP Congress alliance Bhandara ZP ) केली असून अध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे ( Gangadhar Jibhakate Congress for post ZP President ), पंकज राहागडाले तर उपाध्यक्ष पदासाठी भाजपाचे संदीप ताले यांची निवड झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांच्यासाठी अस्थितीत्वाची लढाई ठरलेल्या या निवडणुकीत नानांनी स्वतःचे पद वाचविण्यासाठी भाजपाच्या कुबड्या घेतल्या आहेत. त्यामुळे या नवीन युतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

माजी आमदार आणि नवनियुक्त अध्यक्षानी दिलेले प्रतिक्रिया

गंगाधर जिभकाटे यांनी काँग्रेस तर्फे तर भाजपा तर्फे संदीप टाले यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे 21 सदस्य निवडून आले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 सदस्य निवडून आले होते. त्यामुळे आघाडी धर्म निभावले जाईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होईल असे वाटत होते. मात्र नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या अध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपाशी हात मिळवणी करून 7 पैकी 4 ठिकाणी काँग्रेसला सत्ते बाहेर ठेवले होते. त्याचाच वचपा काढत आज झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपाच्या नाराज माझी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील 12 पैकी 6 मते फोडली आणि त्याच्या साहाय्याने अध्यक्ष पद आपल्या पदरी पाडून घेतले. या निवडणुकीत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे यांना 27 मते तर भाजपाचे संदीप टाले यांना 27 मते मिळवून विजय मिळविला.

नाना पटोलेंचे अध्यक्ष पद होते धोक्यात : 52 पैकी 21 जागेवर निवडून आल्याने काँग्रेस सत्तेचा मुख्य दावेदार होता. मात्र सत्ता स्थापनेसाठी 6 मतांची गरज असल्याने नाना पटोले यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कोणाच्या तरी कुबड्याची गरज असल्याने आणि त्यांना राष्ट्रवादी तर्फे होत असलेला विरोध बघता सत्ता स्थापन करणे कठिण जात होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा स्वजिल्हा असल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविणे गरजेचे होते. कारण तसे न झाल्यास त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. सरते शेवटी नाना पटोले यांनी आपले अस्थित्व वाचविण्यासाठी भाजपाच्या नाराज गटाची कुबडी घेतली. काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष बनवून खऱ्या अर्थाने स्वतःचे अध्यक्ष पद वाचविले आहे. नाराज माजी आमदार यांना या विषयी बोलताना सांगितले, की माझ्या कार्यकत्यांसह पंचायत समितीच्या निवडणुकीत दगा केला गेला होता. म्हणून आज त्यांच्या भावना समजून आज हा निर्णय घेतला आहे. आम्ही अजूनही भाजपा कार्यकर्ते आहोत पुढे जी कार्यवाही होईल, त्यानंतर पुढचे निर्णय घेऊ.

हेही वाचा - MNS Leader Vasant More : ...तोपर्यंत पक्ष कार्यालयात जाणार नाही; वसंत मोरे यांचा निर्धार

Last Updated : May 10, 2022, 8:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.